शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
3
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
5
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
6
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
7
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
8
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
9
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
10
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
11
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
12
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
13
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
15
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
17
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
18
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
19
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
20
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक

जातपडताळणी प्रकरणी नगरसेवकांचे भवितव्य टांगणीला

By admin | Published: August 05, 2016 1:41 AM

सुनावणी पूर्ण : वृषाली कदम यांना दिलासा; महापौरांच्या अर्जावर आज निकाल होणार

कोल्हापूर : महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सातजणांच्या जातपडताळणीबाबतची उच्च न्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. यामध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली दुर्वास कदम यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची विभागीय जातपडताळणी समितीने फेरतपासणी करून त्यांंना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय देऊन दिलासा दिला; तर इतर सहाजणांवर मात्र अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम राहिली आहे. महापौरांच्या अर्जावर आज, शुक्रवारी निकाल होणार आहे. महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांच्यासह डॉ. संदीप नेजदार, दीपा दिलीप मगदूम (काँग्रेस), सचिन पाटील (राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजप), नीलेश देसाई (ताराराणी आघाडी) यांचे जातीचे दाखले विभागीय जातपडताळणी समितीने रद्द करण्याची कारवाई केली होती. त्या निर्णयाविरोधात सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायाधीश शंतनू केमकर व एम. एस. कर्णिक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. रामाणे यांच्यावतीने अ‍ॅड. अनिल अंतुरकर, तर देसाई यांच्यावतीने अ‍ॅड. रामचंद्र मेंदाडकर-पाटील यांनी बाजू मांडली. याशिवाय प्रत्येक नगरसेवकाने स्वतंत्र दावे दाखल केल्याने प्रत्येकाच्या वकिलांनी आपली बाजू स्वतंत्रपणे मांडली.गेल्या दोन सुनावण्यांत महापौर रामाणे, नगरसेवक नीलेश देसाई यांच्याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती; तर उर्वरित संतोष गायकवाड, सभापती वृषाली कदम, डॉ. संदीप नेजदार, सचिन पाटील, दीपा मगदूम यांच्याबाबतची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या सुनावणीवेळी नगरसेवकांच्या वकिलांनी विभागीय जातपडताळणी समितीने चुकीचा निर्णय कसा दिला होता, याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच जातीच्या दाखल्याबाबत प्रत्येकाने वारसांच्या वंशावळीचे पुरावे सादर केले.गुरुवारी सर्व नगरसेवकांबाबतची जातपडताळणीची सुनावणी पूर्ण झाली. यामधील वृषाली दुर्वास कदम यांच्या जातीच्या दाखल्याबाबत विभागीय जातपडताळणी समितीने फेरपडताळणी करून निर्णय द्यावा, असा निकाल दिल्याने त्यांना दिलासा मिळाला; पण महापौर रामाणे यांच्यासह सहाजणांचा निकाल राहून ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जातीचा दाखला रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे.वृषाली कदम यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पुन्हा एकदा पडताळणी समितीकडे पाठविले. त्यामुळे कदम यांना दिलासा मिळाला. कदम यांनी केलेल्या याचिकेनुसार, कोल्हापूरच्या तहसीलदारांकडे जातीचा दाखला सादर करून जात प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी ते जातपडताळणी समितीपुढे सादर केले. पडताळणीदरम्यान तहसीलदारांनी कदम यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने जातप्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच येत नाही, असे समितीला कळविले. त्यामुळे जात पडताळणी समितीने कदम यांंना जातवैधता प्रमाणपत्र दिले नाही. त्याच दिवशी आयुक्तांनी त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविले. मात्र, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदारांनी त्यांच्या कार्यालयातील रेकॉर्डमध्ये कदम यांचा जातीचा दाखला सापडल्याचे जातपडताळणी समितीला कळविले. पण हे आयुक्तांनी विचारात न घेता कदम यांना अपात्र ठरविले. त्यामुळे उच्च न्यायालयाने जातपडताळणी समितीला पुन्हा एकदा कदम यांचे जात प्रमाणपत्र पडताळण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)