शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

डॉक्टर युवतीशी जवळीक करुन केला विनयभंग, टि.व्ही. मालिकेतील कलाकारास कोल्हापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 1:45 PM

दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत आहे

कोल्हापूर : ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर डॉक्टर युवतीशी लगट वाढवून तिचा विनयभंग करणाऱ्या टि. व्ही. मालिकेतील कलाकारास राजारामपूरी पोलिसांनी आज, शनिवारी पहाटे अटक केली. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२ रा. कात्यायणी कॉप्लेक्स, कळंबा, कोल्हापूर) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. तो सद्या दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत युवती ही पेशाने डॉक्टर आहे. संशयित जितेंद्र पोळ व तिची ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाली. ओळखीनंतर त्याने पीडित तरुणीशी लगट वाढविण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडित तरुणी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जाऊन तिच्याशी मला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे सांगून सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.युवतीने लग्नाच्या प्रस्तावाला वारंवार नकार दिला. तरीही संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने नातेवाईकाकडे तक्रार करून थेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. पोलीस चौकशीमध्ये संबंधित तरुण दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे असेही ओमासे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी