शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

‘अथर्व-दौलत’ कारखाना दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल, अध्यक्ष खोराटे म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:30 AM

शेतकऱ्यांनीच मला सांगावे की, मी काय करावे, असा सवालच ‘अथर्व-दौलत’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी उपस्थित केला

चंदगड : उपद्व्यापी कामगारांमुळे माझ्या अनेक कामगार व अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे त्या कामगारांना घेऊन मला कारखाना सुरू करणे अशक्य आहे. शेतकऱ्यांनीच मला सांगावे की, मी काय करावे, असा सवालच ‘अथर्व-दौलत’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी उपस्थित केला. मंगळवारी हलकर्णी येथे अथर्व-दौलत कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोनसच्या मागणीकडे दुर्लक्ष करत शिफ्टमध्ये कामावर बोलवून जनरल शिफ्टमध्ये कामावर आलेल्या कामगारांना आत न घेतल्याच्या रागातून आतील कामगारांना मारहाण करून दौलतच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ते निवळले. मात्र, अशा वातावरणात आतील कामगारांचा जीव टांगणीला लावून मला कारखाना चालविणे अशक्य आहे. त्यामुळे त्या ७० कामगारांना वगळून इतर कामगारांना घेऊन मी लवकरात लवकर काम पूर्ण करून कारखाना सुरू करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, त्या ७० कामगारांसाठी इतर कामगारांनी मला सहकार्य केले नाही तर कारखाना सुरू करणे शक्यच नाही.

विशिष्ट हेतूनेच हल्ला

बोनसविषयी कामगारांनी माझ्याशी बोलणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना वेळसुद्धा दिली होती. मात्र, ते आले नाहीत. उलट, कामावर असलेल्या कामगारांना मारहाण केली. त्यामुळे सोमवारचा हल्ला हा विशिष्ट हेतूनेच केला होता. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखेच त्यांचे कृत्य होते.

दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखलदगडफेकप्रकरणी कामगार पी. डी. सरवदे यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी (१६) जणांवर विविध कलमांन्वये चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महादेव आप्पा फाटक (रा. फाटकवाडी), अशोक गावडे (रा. डुक्करवाडी), अशोक चांदेकर, मल्लाप्पा केसरकर, संजय विठ्ठल देसाई, रामलिंग मऱ्याप्पा पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, झेलू गावडे, दत्तात्रय मोहिते, सुधाकर पवार, उत्तम निचम, महांतेश कणगली, संजय तुकाराम हजगोळकर, सहदेव पाटील, सुरेश पाटील, केदारी पाटील व इतर २०० ते २५० कामगारांच्या विविध कलमांन्वये चंदगड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने