- राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र महायुतीच्या सरकारप्रमाणे कॅशलेस सक्ती केली तर शेतकऱ्यांना दिलाशापेक्षा मनस्ताप अधिक होणार आहे. या कारणामुळेच ‘गोकुळ’, ‘राजारामबापू’ सह राज्यातील अनेक सहकारी दूध संघांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे कॅशलेसची सक्ती न करता थेट शेतकºयांच्या खात्यावर अनुदान वर्ग करणे गरजेचे आहे.
पावडरच्या दरात मोठी घसरण झाल्याने दूध संघांकडून प्रतिलिटर २० ते २६ रुपयांप्रमाणे दूध खरेदी केले जात आहे. शासन अनुदान देण्याच्या तयारीत आहे. प्राथमिक दूध संस्थांकडे कोणी किती दूध घातले, याची योग्य माहिती असते.