कोल्हापूर : बाजारपेठेत काश्मिरी पेरू, गुजराती लिची आणि आफ्रीकन, इटालियन, वॉशिंग्टन सफरचंदाची आवक वाढली आहे. १२0 ते १८0 रुपये किलो दराने ही फळे मिळत असून, या निमित्ताने परदेशी फळांची चव चाखायला मिळत आहे. दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. धान्य, कडधान्यांचे दरही स्थिर आहेत.मेथी व कोथिंबिरीची आवक वाढली आहे. मेथी १0 ते १५, तर कोथिंबीर १0 ते २५ रुपये पेंढी असे दर आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर दुप्पट होते. गवारीचे दर्शन दुर्मीळच असून, भावही १00 रुपये किलो असेच चढे आहेत. कारली, वांगी, दोडका, वरणा, दीडका, बीन्स, ढबू ५0 ते ६0 रुपये किलो आहेत.कांद्याचे दर २0 रुपयांवर स्थिर आहेत, तर बटाट्याचे दर पाच रुपयांनी कमी होऊन ते २0 रुपये किलो झाले आहेत. आले आणि लसूण १00 ते १२0 किलो आहेत. टोमॅटो २0 रुपये किलो आहेत. लिंबूचे दर गडगडले आहेत. १0 रुपयांना पाच असणारे लिंबू आता पाच रुपयांना १0 मिळत आहेत.साखरेच्या दरात वाढसाखरेच्या दरात वाढ सुरू झाली आहे. ३४ रुपयांवरून ३६ रुपयांवर दर पोहोचले आहेत. आणखी वाढ होणार असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले.धान्य, कडधान्य स्थिरगेले महिनाभर सुरू असलेल्या धान्य, कडधान्याच्या दरवाढीस या आठवड्यात काहीसा ब्रेक लागला आहे. कोणतीही नवीन वाढ नसली, तरी दर मात्र स्थिरच आहेत. ज्वारी अजूनही ३0 ते ५२ रुपये आणि गहू २८ ते ३५ रुपये, तांदूळ २४ ते ८0 रुपये किलो याच पटीत आहेत. मूग आणि तूरडाळ ९४ रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत. हरभरा डाळ ७0 रुपयेच आहे. मूग, चवळी, वाटाण्याने मात्र उसळी घेतली असून, प्रत्येकी ८0 रुपये किलो दर झाला आहे. मटकीचा दर सर्वाधिक १२५ रुपये किलो आहे. मसूर ६0, मसूरडाळ ६८ रुपये आहे.उपवास महागलाआता उपवासाचे दिवस सुरू झाल्याने वरी, शाबूची मागणी वाढली आहे. दरातही वाढ दिसत आहे. दोन्हीही प्रत्येकी ९0 रुपये किलो दर आहेत. शेंगदाणे ११0 रुपये आहेत.