तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला ‘कॅसिनो’ या आॅनलाईन जुगाराने घेरले आहे. ‘एका रुपयाला ३५ ते ९० रुपये भाव’ या आमिषाने युवा पिढी, उद्योजक, व्यावसायिक आॅनलाईन गेमच्या जाळ्यात अडकत आहेत. आॅनलाईन सॉफ्टवेअरच्या करामतीवर या बुकी, लॉटरीचालकांनी आता पुढील मजल मारली असून, कॅसिनो खेळणाऱ्यांना पोलीस कारवाईची भीती असेल अगर स्वत:ची प्रतिष्ठा जपायची असेल तर त्यांना घरबसल्याही ‘कॅसिनो’ खेळ उपलब्ध करून दिले आहेत. खेळणाºयाने फक्त लॅपटॉप अगर टॅब घेऊन सेंटरवर यायचे अन् ‘कॅसिनो’ डाउनलोड करून घरी जाऊन खेळायचे, इतकेच. आॅनलाईन जुगाराची आर्थिक व्याप्ती नजीकच्या काळात घराघरांत पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्टÑात कॅसिनो आॅनलाईन जुगाराला बंदी असली तरी गेल्या चार-पाच वर्षांत मटका, जुगार व्यवसायांतील बुकी आणि बड्या लॉटरीचालकांनी आधुनिकतेची कास धरत ‘कॅसिनो’ या आॅनलाईन जुगाराला प्रारंभ केला. आजच्या परिस्थितीत कोल्हापूरसारख्या शहरात अवघ्या तीन प्रमुख चौकांत सुरू असलेल्या या ‘कॅसिनो’च्या व्याप्तीला नजीकच्या काळात पोलीस कारवाईत रोखले नाही तर त्याची व्याप्ती मटक्याच्या टपºयांप्रमाणे गल्लीबोळांत व पर्यायाने घरांत, कुटुंबातही पोहोचण्याची शक्यता आहे. ‘लकी विन व गेम्स किंग’च्या नावाखाली हा व्यवसाय कमालीचा फोफावत आहे. यामध्ये लोग चांगलेच गुरफटले जात आहेत.
कोल्हापूर शहरातील फोर्ड कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, गोखले कॉलेज चौक, शिंगोशी मार्केट (मिरजकर तिकटी), कसबा बावडा, तसेच इचलकरंजी, हातकणंगले, कुरुंदवाड, शिरोळ, वडगाव, जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी), कागल येथेही भरचौकांत ‘कॅसिनो’ आॅनलाईन जुगार मांडला आहे.‘कॅसिनो’च्या प्रत्येक मशीनवर रोजची उलाढाल लाखो रुपयांची असली तरीही त्या ठिकाणी फक्त दोन कामगारच ठेवले जातात.
बुकीमालक, लॉटरीचालकांनी ‘कॅसिनो’ जुगार हा आता घरबसल्या एका ‘क्लिक’वरही खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गेम खेळणाºयाने आपला मोबाईल, लॅपटॉप अगर टॅब घेऊन कॅसिनोच्या सेंटरवर यायचे अन् ‘कॅसिनो’ डाउनलोड व लाखो रुपयांचा बॅलन्स टाकून घरी जाऊन खेळायचे. घरबसल्या ‘कॅसिनो’ खेळताना जादा रक्कम जिंकल्यास ती कॅसिनोच्या मुख्य सेंटरवरून घेऊन जायचे, बस्स. त्यासाठी ‘कॅसिनो’ डाउनलोड करून दिलेल्या लॅपटॉपला काही कोड नंबर दिले जातात. त्यामुळे एकाच वेळी कितीही जणांना हा गेम डाउनलोड करून दिला जातो.बुकीच होतो मालामालमटक्याचा निकाल दिवसातून चारवेळा लागतो; पण या ‘कॅसिनो’ जुगाराचा निकाल एका क्लिकवर झटपट, प्रत्येक मिनिटाला लागतो; त्यामुळे रोज प्रत्येक मशीनवर लाखो रुपयांची उलाढाल होते. ‘कॅसिनो’च्या सॉफ्टवेअरमध्ये बुकीमालकालाच मालामाल करण्याची करामत आहे. ज्या नंबरवर बेटिंग जादा, तो अंक डावलून ज्या नंबरवर कमी बेटिंग तो काढण्याची यंत्रणा या गेममध्ये कार्यान्वित आहे.अनेकांचे संसार उद्ध्वस्त‘कॅसिनो’ या गेममुळे अत्यंत कमी वेळेत अनेक लखपती हे अक्षरश: ‘रोडपती’ बनल्याची उदाहरणे आहेत. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे गेमचे व्यसन जडलेल्या अनेकांनी आपल्या पत्नीचे दागिने विकल्याची, वाहने गहाणवट ठेवल्याची उदाहरणे आहेत. या व्यवसायातून अनेकजण कंगाल झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्या; पण पोलीस दप्तरी नोंद मात्र आहे ‘आकस्मिक मृत्यू’ची!दक्षतेसाठी ‘चिनी’ सॉफ्टवेअर‘कॅसिनो’ या गेममध्ये रोज लाखोंची उलाढाल होत असल्याने त्याची वेबसाईट कोणीही हॅक करू नये म्हणूनही दक्षता घेण्यात आलेली आहे. ‘कॅसिनो’च्या वेबसाईटचे सॉफ्टवेअर हे चिनी तंत्रज्ञांकडून तयार करवून घेतले आहे. परिणामी या ‘कॅसिनो’ जुगाराची व्याप्ती देशाबाहेरही पोहोचली आहे.