शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जातीचे राजकारण रंग दाखवणार

By admin | Published: October 01, 2014 10:37 PM

नाराजांकडे लक्ष : काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना, स्वाभिमानीचे आव्हान

संदीप बावचे-- शिरोळ--विधानसभा मतदारसंघासाठी चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना व स्वाभिमानीचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेसला यश आले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांतील नाराज गटाने शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने पहिल्या टप्प्यातच विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे. येथे जातीचे राजकारण रंग दाखवणार, अशी चिन्हे आहेत. मतदारसंघात जैन, लिंगायत विरुद्ध मराठा अशा जातीच्या राजकारणाने या निवडणुकीत एकदम उसळी घेतली आहे..काँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, सेनेचे उल्हास पाटील, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे रिंगणातील प्रमुख उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव व ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील या मातब्बरांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेऊन मराठा समाजाचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठिंबा दिला. महायुती व आघाडीत घटस्फोट झाल्यानंतर शिरोळ तालुक्यातीलही अनेक राजकीय संदर्भ बदलले. पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता रंगली. कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार सा. रे. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? यावरून राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. अखेर यड्रावकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन बाजी मारली. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे म्हणजेच पर्यायाने खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे उल्हास पाटील की सावकर मादनाईक या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायचा, हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. या दोघांनीही जोरदार तयारी केली होती. मात्र, स्वाभिमानीने उमेदवारी डावलल्यामुळे उल्हास पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. यामुळे स्वाभिमानी पक्षात चांगलाच राजकीय भूकंप झाला. पाच वर्षांपूर्वीच सावकर मादनाईक यांना २०१४ ची उमेदवारी देण्याचा पक्षातील कोअर समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. प्रचार कार्यक्रमात शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यात चांगले काम केले असताना स्वाभिमानीने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. गेली दहा वर्षे आघाडी म्हणून शिरोळ तालुक्यात विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील व राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर या गुरू-शिष्याने एकत्रित काम केले आहे. मात्र, विधानसभेच्या या निवडणुकीत दोघेही आता एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे बळ वाढले, असे चित्र असताना महायुतीतील घटस्फोटामुळे शिवसेना स्वाभिमानीपासून वेगळी झाल्यामुळे मतविभागणी होणार का? शिवाय उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे स्वाभिमानीतील मतांचीही विभागणी होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत असला तरी मतविभागणीचा फायदा कोणाला मिळणार आणि शिरोळचा ‘गड’ कोण जिंकणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.