कोल्हापूर : बहुतांशी लोकांमध्ये सर्वात माणसाळलेला प्राणी म्हणून मांजराकडे पाहिले जाते. या पाळीव देशी-विदेशी प्रांतातील मांजरांची रूपे रविवारी कोल्हापूरकरांना जवळून अनुभवता आली. फेलाइन क्लब ऑफ इंडियाच्या (कोल्हापूर शाखा) वतीने लोणार वसाहतीतील महाराजा बॅक्वेट हाॅल येथे हा अनोखा कॅट शोचे आयोजित करण्यात आले होते. यात देशाच्या कानाकोपऱ्यांतून २००हून अधिक मांजरांनी सहभाग घेतला.कोरोनानंतर तिसऱ्यांदा हा अनोखा मांजरांचा शो रविवारी रंगला. शो पाहण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. यात महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, केरळ, गोवा, कोलकाता आदी राज्यांतून देशी व विदेशी प्रजातींच्या २०० मांजरांनी शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी मांजरांची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या कॅट शोमध्ये माहिती देण्यात आली.विशेष म्हणजे लहानग्यांचा ही मांजरे पाहण्यासाठीचा मोठा उत्साह ओसांडून वाहत होता. विशेषकरून बेंगाॅल कॅट (चित्यासारखे) या मांजरास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, तर मेन कुन इंडीमाऊ, ब्लॅक डायमंड कॅट, पर्शियन क्लासिक लाँग हेअर कॅट, रशियन ब्ल्यू ग्रे कॅट अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता.देशी-विदेशी या दोन विभागात मांजरांंच्या विविध जातीनिहाय निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली. या मांजरांचे मूल्यमापन करण्यासाठी खास स्पेन येथून रोजा मंडोजा व नाशिकचे साजीद पठाण परीक्षक म्हणून आले होते. या शोसाठी दिगंबर खोत, अभिषेक चिले, अकिब शिकलगार, मोहम्मद राजगोळे, मुकुंद भिडे, शुभम कोथमिरे, दस्तगीर शिकलगार, आदींनी परिश्रम घेतले.किमती हजार ते लाखांपर्यंत
या अनोख्या कॅट शोमध्ये सहभागी झालेल्या मांजरांचा प्रवास विशेषत: विमानातून होतो, तर किंमतही अगदी दहा हजारांपासून लाखांपर्यंत आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.सेल्फीसाठी गर्दी
या कॅट शोमध्ये पिंजऱ्यातून आणलेली देशी-विदेशी जातीचे मांजरे पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लहानग्यांसह मोठ्यांचीही झुंबड उडाली होती.
बेंगाॅल कॅट
रशियन ब्ल्यू ग्रे कॅट
पर्शियन क्लासिक लाँग हेअर कॅट
मेन कुन इंडीमाऊ
ब्लॅक डायमंड कॅट