कोल्हापूर : सेफ्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (सी.आर.डी.एफ.) यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून महापालिकेस दोन सक्शन गाड्या भेट दिल्या. या दोन्ही गाड्यांची किंमत ४५ लाख रुपये आहे. प्रत्येकी साडेबावीस लाख रुपये किंमत असलेल्या या सक्शन गाड्या साधारणपणे तीन हजार लिटर क्षमतेच्या आहेत.
सेफ्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रतिनिधी दिग्विजय केरकर व मृदुला पाटील यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे या दोन गाड्या सुपूर्द केल्या, तर बलकवडे यांच्या हस्ते गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, एच.डी. एफ. सी. बँकेचे एच. टी. पारिख, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक विकास भोसले उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १४०७२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेस सेफ्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्यामार्फत सी. एस. आर. फंडातून ४५ लाख रुपये किमतीच्या दोन सक्शन गाड्या भेट दिल्या, त्याचे लोकार्पण प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते बुधवारी झाले.