सातारा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिनानिमित्त मंगळवारी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी संविधानाच्या पुढील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. ह्यआम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित करून स्वत: प्रत अर्पण करीत आहोत, असे सर्वांनी एकत्रित वाचन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर, सर्व प्रांताधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.