शिरोली : प्रशासनानेे घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी केले. ते शिरोली ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या गणेशोत्सव बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते. या वेळी खांडवे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सण मोठ्या स्वरुपात साजरे करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे गणेशोत्सवात नियमांचे पालक करा असे सांगत गणपती मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आरतीला गर्दी करू नका, मंडळांनी पोलीस ठाणे, संबंधित ग्रामपंचायत, धर्मादाय संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नागावचे सरपंच अरुण माळी, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, सतीश पाटील, ज्योतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, सरदार मुल्ला, ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. भोगम, प्रकाश कौदाडे,, निलेश कांबळे उपस्थित होते.
फोटो : ०७ शिरोली बैठक
शिरोली येथील बैठकीत नूतन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, बॅंक ऑफ इंडियाचे नूतन शाखाधिकारी मोहम्मद शेख यांचा सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.