लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : सलग दोन वर्षे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यावर कोरोना महामारी आणि महापुराचे संकट असल्याने करवीर तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले. करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांतील तरुण मंडळांची बैठक शिंगणापूर फाटा येथील वसंत-हरी हॉलमध्ये आयोजित केली होती. यावेळी संदीप कोळेकर यांनी मंडळांना मार्गदर्शन केले. या बैठकीला शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेवाडी, बालिंगा, पाडळी, फुलेवाडी, रिंग रोड येथील शंभर ते दीडशे तरुण मंडळाने सहभाग नोंदवला होता. या वेळी कोळेकर यांनी मंडळांनी गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत ठेवाव्यात, डॉल्बी बंदी, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे यांनी तरुण मंडळे सर्व नियमास अधिन राहून यावर्षी गणेशोत्सव साजरा करतील, असे आश्वासन दिले. या वेळी बालिंगा सरपंच मयूर जांभळे, हणमंतवाडी पोलीस पाटील रवींद्र जाधव, पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर, फुलेवाडीचे विजय देसाई उपस्थित होते.
060921\img-20210905-wa0193.jpg
करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने शिंगणापूर हनुमंतवाडी बालिंगा पाडळी फुलेवाडी रिंग रोड येथील गणेश तरुण मंडळ आन्ना गणेश गणेश उत्सवाबाबत प्रबोधन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर बोलत होते यावेळी सरपंच सरिता जाधव प्रकाश रोटे मयूर जांभळे तानाजी पालकर उपस्थित होते