सावरवाडी : कोरोना महामारीचे सणासुदीच्या काळात होणारे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाचे नियम पाळून यंदाचा गणेशोत्सव सोहळा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.
बीडशेड (ता. करवीर) येथील महालक्ष्मी सभागृहात गणेश उत्सवानिमित्त आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कोळेकर बोलत होते.
करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व कॉंग्रेस नेते राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, तरुण मंडळांनी सयम ठेऊन उत्सवाला कुठेही गालबोट न लागता साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा.
बैठकीत शेतकरी आंदोलक नेते मुकुंद पाटील, कसबा बीडचे सरपंच सरपंच सर्जेराव तिबिले, महेचे सरपंच सज्जन पाटील, सावर्डे दुमालाचे सरपंच कुंडलिक कारंडे, ग्राहक चळवळीचे नेते जगदीश पाटील, सागर चौगले, शिवाजी चव्हाण आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक बैजू पाटील यांनी केले. शेवटी विनायक तळेकर यांनी आभार मानले.
बैठकीला परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तरुण मंडळाचे पदाधिकारी, उपस्थितीत होते.
फोटो ओळ = बीडशेड येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित वीस गावांच्या बैठकीत करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी संबोधित केले. या वेळी बैजू पाटील, मुकुंद पाटील, सरपंच, सर्जेराव तिबीले, राजेंद्र सूर्यवंशी, सज्जन पाटील, कुंडलिक कारंडे आदी उपस्थित होते.
०४ बीडशेड पोलीस