कोल्हापूर : कोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. यासह होळी, शिमगा, धूलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.कोल्हापुरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रविवारी हा सण साजरा होत असून सोमवारी धूलिवंदन व २ एप्रिल रोजी रंगपंचमी आहे. यानिमित्त एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने नागरिकांनी उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रार्थना सभांचे ऑनलाइन प्रक्षेपण कराख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस २ एप्रिलला, तर इस्टर संडे ४ एप्रिलला आहे. हे सण ख्रिस्ती बांधवांनी साधेपणाने साजरे करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्या आहेत. २८ मार्च ते ४ एप्रिल या ह्यहोली वीकह्णमध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार गर्दीचे व्यवस्थापन करावे. मोठे चर्च असल्यास ५० लोक व जागा कमी असल्यास १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभा घ्यावी.आवश्यकतेनुसार ४ ते ५ खास प्रार्थना सभा घ्याव्यात. सभेच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉट्सॲप, फेसबुक, यू-ट्यूब यासारख्या सोशल मीडिया माध्यमांतून प्रसारित करावे. मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:48 PM
CoronaVirus Religious programme Kolhapur-कोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. यासह होळी, शिमगा, धूलिवंदन व रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
ठळक मुद्देहोळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे कराकोविड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची सूचना