कोल्हापूर : लोकप्रियतेचा माईलस्टोन ठरलेल्या लोकमत महामॅरेथाॅनच्या पाचव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यंदा कोल्हापुरात १३ मार्चला महामॅरेथाॅन रंगणार आहे. यातील विजेत्यांना एकूण दहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.महामॅरेथाॅनच्या नावनोंदणीला दणकेबाज सुरुवात झाली आहे. लोकांचा प्रतिसादही चांगला आहे. मॅरेथाॅनमधील सहभागी धावपटूंसह नागरिकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षांतील ही पहिलीच थेट मैदानातून होणारी मॅरेथाॅन असल्याने याबद्दल कोल्हापूरकरांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.गेली चार पर्व या महामॅरेथाॅनला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन आदी वैशिष्ट्ये असणारी ही महामॅरेथाॅन कोल्हापूरकरांची एक वेगळी ओळख बनली आहे. त्यात सहभागी होण्याचा अनुभव, आरोग्यदायी, आनंददायक आहे. त्यामुळे या मॅरेथाॅनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिक उत्सुक असतात.पोलीस मुख्यालय मैदानात १३ मार्चला पहाटे ५ वाजता या महामॅरेथाॅनला सुरुवात होईल. यात ३ कि.मी.ची फॅमिली रन, ५ कि.मी. फन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), दहा कि.मी.ची पाॅवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील), २१ कि.मी. (१८ वर्षांपेक्षा जास्त) असेल. विविध गटांमधील विजेत्यांना एकूण दहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा.
नावनोंदणी येथे करा.यापूर्वीच्या महामॅरेथाॅन सीझन-३ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथाॅनमय होणार आहे. महामॅरेथाॅन सीझन ५ साठी आजच नोंदणी करा. यामध्ये सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/maha-marathon.kolhapur-o44311 या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल क्रमांक विक्रांत देसाई ९६३७३३०७०० अथवा सचिन कोळी ९७६७२६४८८५ वर नोंदणी करता येणार आहे. लवकरात लवकर इच्छुकांनी नोंदणी करावी.
मी लोकमत महामॅरेथाॅनचा एक भाग आहे. मॅरेथाॅनचे तपशीलवार नियोजन आणि धावपटूंना चांगला अनुभव देण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. मी ही सहभागी होऊन धावण्यासाठी इच्छुक आहे. तुम्ही सहभागी व्हावे. - आकाश कोरगावकर, आयर्न मॅन
लोकमत महामॅरेथाॅनचे संयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले जाते. व्यावसायिक रनर बनविण्याची पहिली पायरी म्हणजे ही मॅरेथाॅन आहे. आयर्न मॅन बनविण्यासाठी कोल्हापूर जगात भारी पडले आहे. याची तयारी म्हणून लहानग्यांसह अबालवृद्धांकरिता ही महामॅरेथाॅन बहुउपयोगी आहे.- महेश्वरी सरनोबत
आमच्या ग्रुपमध्ये ५३ जणांपैकी ४३ जणांना किमान २०० मीटर धावता येत नव्हते. मात्र, नियमित सरावाने आता यंदाच्या पाचव्या लोकमत महामॅरेथाॅनच्या पर्वात ही सर्व मंडळी २१ कि.मी. अंतर धावणार आहेत. ही बाब आमच्या क्राॅसफीट फिटनेस ॲकॅडमीच्या ग्रुपच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे. - प्रवीण मिरजे, प्रशिक्षक, क्राॅसफीट फिटनेस ॲकॅडमी, इचलकरंजी