कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पध्दतीने आणि साधेपणाने शिवजयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे शुक्रवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष यावेळी करण्यात आला.
येथील दसरा चौकातील चित्रदुर्ग मठामध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा करण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. बसव पुरस्कारप्राप्त समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, राहुल नष्टे यांचा पालकमंत्री पाटील आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे, सचिव राजू वाली, राजेश पाटील (चंदूरकर), ॲड. सतीश खोतलांडे, किरण सांगावकर, माळी समाजाचे अध्यक्ष अशोक माळी, तेली समाजाचे अध्यक्ष गजानन सावर्डेकर, गवळी समाजाचे अध्यक्ष दिलीप गवळी, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, किरण व्हनगुत्ते, केतन तवटे, राहुल नष्टे, चंद्रकांत नासीपुडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी कदम, उपाध्यक्षा सुनीता शेटे, माधवी बोधले, अमृता करंबळी, सविता सन्नकी, सुजाता विभुते, बी. एस. पाटील उपस्थित होते.
चौकट
घरी षटस्थल ध्वजाची उभारणी
चित्रदुर्ग मठामध्ये सकाळी पंचामृत अभिषेक पूजा, प्रतिमा पूजन, पाळणा, जन्मकाळ आणि इतर विधी गुरूप्रसाद स्वामी, कुमार स्वामी, धनंजय स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कोरोनाबाबतचे नियम पाळून हा सोहळा झाला. समाजबांधवांनी आपआपल्या घरी षटस्थल ध्वज उभारून प्रतिमा पूजन करून जयंती साजरी केली. कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर आणि अक्कमहादेवी यांच्या वेशभूषा स्पर्धा, घरी केलेली सजावट स्पर्धा घेण्यात आली.
फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनील गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, सतीश खोतलांडे, किरण व्हनगुत्ते, अशोक माळी, शिवानंद बनछोडे, दिलीप गवळी, चंद्रकांत नासीपुडे, शिवकुमार हिरेमठ, आदी उपस्थित होते.
फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती ०१ ) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनील गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, चंद्रकांत नासीपुडे, मीनाक्षी कदम, सुनीता शेटे, अमृता करबळी, माधवी बोधले, सुजाता विभुते, सविता सनक्की आदी उपस्थित होते.
===Photopath===
140521\14kol_4_14052021_5.jpg~140521\14kol_5_14052021_5.jpg
===Caption===
फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनिल गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, सतिश खोतलांडे, किरण व्हनगुत्ते, अशोक माळी, शिवानंद बनछोडे, दिलीप गवळी, चंद्रकांत नासीपुडे, शिवकुमार हिरेमठ, आदी उपस्थित होते.फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती ०१ ) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनिल गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, चंद्रकांत नासीपुडे, मीनाक्षी कदम, सुनिता शेटे, अमृता करबळी, माधवी बोधले, सुजाता विभुते, सविता सनक्की, आदी उपस्थित होते.~फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनिल गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, सतिश खोतलांडे, किरण व्हनगुत्ते, अशोक माळी, शिवानंद बनछोडे, दिलीप गवळी, चंद्रकांत नासीपुडे, शिवकुमार हिरेमठ, आदी उपस्थित होते.फोटो (१४०५२०२१-कोल-महात्मा बसवेश्वर जयंती ०१ ) : कोल्हापुरात शुक्रवारी चित्रदुर्ग मठात महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शेजारी सुनिल गाताडे, सुहास भेंडे, राजेश पाटील, चंद्रकांत नासीपुडे, मीनाक्षी कदम, सुनिता शेटे, अमृता करबळी, माधवी बोधले, सुजाता विभुते, सविता सनक्की, आदी उपस्थित होते.