कुरुंदवाड : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन उपाययोजना राबवत आहे. यासाठी शासनाने लागू केलेल्या आचारसंहितेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. मुस्लिम समाजबांधवांनी शासनाच्या आदेशाचे व नियमांचे पालन करून आपल्या घरीच हा महिना साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी केले.
येथील पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजबांधव, नगरसेवकांची शांतता बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक निरावडे बोलत होते. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मिरासाहेब पाथरवट, दादेपाशा पटेल, भोला बारगीर यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून मुस्लिम समाज रमजान महिना साजरा करतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक फारूक जमादार, शकील गरगरे, लियाकत बागवान, अफसर पटेल, अली पठाण, बालेचाँद अपराध, अक्रम पट्टेकरी, अस्लम जमादार, गौस बागवान, दस्तगीर फकीर, सरफराज जमादार, इकबाल पटवेगार आदी उपस्थित होते.