आजरा तालुक्यात सर्वत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, शाळा, महाविद्यालय, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये राजश्री शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरमध्ये उपाध्यक्षा गीता पोतदार यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांनी शाहू महाराज यांचे समाजाबाबतचे धोरण याविषयी माहिती दिली. यावेळी कार्यवाह सदाशिव मोरे संचालक आय.के. पाटील, संभाजी इंजल, रवि हुक्केरी, डॉ.अंजनी देशपांडे, विद्या हरेर, सुचेता गड्डी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह कर्मचारी उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.अशोक सादळे यांच्या हस्ते राजश्री शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख राम मधाळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन रणजित भादवणकर यांनी केले. उपप्राचार्य राजू टोपले पर्यवेक्षक मनोज देसाई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्यंकटराव हायस्कूलमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व जि.प.सदस्य जयवंत शिंपी यांच्या हस्ते लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा ही उपाधी कशी मिळाली. त्यांचे मुला मुलींच्या शिक्षणाचे धोरण याबद्दलची माहिती सचिव एस. पी. कांबळे संचालक सुनील देसाई यांनी दिली. उपाध्यक्ष अण्णा पाटील, पर्यवेक्षक एस. जी. खोराटे, राजेंद्र कुंभार, संजय पाटील, प्रकाश पाटील, विलास गवारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या हस्ते राजश्री शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. फोटोपूजनवेळी सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आजरा पंचायत समितीमध्ये सभापती उदय पवार यांच्या हस्ते लोकराजा शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
आजरा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून शाहू जयंती साजरी करणेत आली.
२६ आजरा शाहू जयंती
फोटो कॅप्शन - आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरमध्ये लोकराजा शाहूंच्या प्रतिमापूजन प्रसंगी उपस्थित डॉ.अशोक बाचूळकर, गीता पोतदार, मारुती मोरे बंडोपंत चव्हाण यासह अन्य.