कोल्हापूर : कोरोनामुळे शासनाने दहीहंडीच्या आयोजनावर बंदी घातल्याने शहरात मंगळवारी विविध पक्ष, संघटनांच्यावतीने प्रतिकात्मकरित्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
गुजरीतील न्यू गुजरी मित्र मंडळाची दरवर्षी लाखांच्या बक्षिसाची मोठी दहीहंडी असते. मात्र यंदा कोरोनामुळे प्रतिकात्मक दहीहंडी फोडत उत्सवाची परंपरा जपण्यात आली. कळंब्यातील कृष्णा पाटील या बालकाने हंडी फोडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते, नियाज नंदीकर, हर्षल कटके, मिलिंद राशईंगकर, राजेंद्र कदम, सचिन सूर्यवंशी, अनिल यादव, राजेश माळकर, संतोष खोगरे उपस्थित होेते. लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळातर्फे शासकीय नियमांचे पालन करुन छोट्या प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी विनोद सावर्डेकर, विजय कागले, बलराज निकम, राजू नष्टे, बी. एम. शिरहट्टी, शिवाजी मोटे व व्यावसायिक उपस्थित होते.
--
मनसेने फोडली कोरोनाची दहीहंडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुजरी कॉर्नर चौक, भाऊसिंगजी रोडवर प्रतिकात्मकरित्या कोरोनाची दहीहंडी फोडली. जूुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्याहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन झाले. पक्षाच्यावतीने डासप्रतिबंधात्मक फवारणी मशीन खरेदी करून महापालिकेला देण्यात आले. तसेच कोराना व महापुरातील योध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, संजय करजगार, रत्नदीप चोपडे, संजय आडके, अमित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
----------
फोटाे नं ३१०८२०२१-कोल-दहीहंडी०१
ओळ : कोल्हापुरातील गुजरी येथे न्यू गुजरी मित्र मंडळाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करण्यात आली.
---