कोल्हापूर : कारगील युद्धाच्या विजयी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी शहरात अभिमानस फौंडेशनतर्फे ‘सलाम कारगील’ या उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.अभिमानस फौंडेशनतर्फे शहरातील टेंबलाबाई विद्यालय, आदर्श प्रशाला व महाराष्ट्र हायस्कूल येथे कारगील दिनाची माहिती देण्यात आली. तसेच ‘सलाम कारगील’ हा उपक्रम अभिमानस फौंडेशनतर्फे राबविण्यात आला. कारगील युद्धाची माहिती, राष्ट्रगीत आणि मानवंदना यावेळी देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सैनिकांशी प्रश्नोत्तरे करण्याची संधी मिळाली.निवृत्त सैनिकांनी श्रीकांत लायकर, बाजीराव पाटील, योगेश जोशी, सयाजी कुंभार यांनी सैनिकांचे जीवन, येणाऱ्या अडचणी, सैनिकी क्षेत्रातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी सलाम कारगील बँडचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रगीत, अकरा वेळा जयहिंद व दोन मिनिटे मौन राहून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.आदर्श प्रशाला या ठिकाणी मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, सहायक शिक्षक, अभिमानस फौंडेशनचे शशिकांत भालकर, अभिजित सुतार, अनिल यादव उपस्थित होते. गौरव कोल्हापूरकर यांनी स्वागत केले. डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी फौंडेशनचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
अन्य ठिकाणी कारगील विजय दिवस साजरा...कोल्हापूर शहरासह गगनबावडा परिसर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, पणजी, म्हापसा, लांजा, रत्नागिरी, उदयपूर, जयपूर, कोटा आणि अजमेर येथे सलाम कारगील दिन साजरा करण्यात आला. तसेच सॅटिन रिबन बँडचे वाटप करण्यात आले.