येथील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रतिमेला संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. ताहीर झारी लिखित ‘सामान्यजनांचे अण्णा’ या पुस्तकासह ‘शब्दांचे मोती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद कामत, सचिव ॲड. व्ही. एन. पाटील, सदस्य डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, प्राचार्य डॉ. विलास पाटील, विक्रम रेपे, आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी अशा ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे संयोजन एनएसएसचे प्रकल्प अधिकारी डॉ. एस. एफ. बोथीकर, एनसीसी अधिकारी कॅप्टन एस. एस. कदम, लेफ्टनंट डॉ. आर. एस. नाईक यांनी केले.
नव्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन
येथील शहाजी लॉ कॉलेज परिसरात नवे बास्केटबॉल मैदान तयार करण्यात असून, त्याचे आणि योगशिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्याहस्ते करण्यात आले. या नव्या मैदानावर दुपारी बास्केटबॉल स्पर्धा झाली. दरम्यान, डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये सकाळी ऑनलाईन रोजगार मेळावा झाला. सीए सतीश डकरे यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यांनी ‘वाणिज्य क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
फोटो (१५०९२०२१-कोल-डीआरके कॉमर्स कॉलेज) : कोल्हापुरात बुधवारी डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या उदघाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्याहस्ते झाले. यावेळी शेजारी डावीकडून वैभव पेडणेकर, विश्वनाथ मगदूम, विलास पाटील उपस्थित होते.