कोल्हापूर : भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन, रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा विरोधी व्याख्याने अशा विविध सामाजिक उपक्रमांनी बुधवारी बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. सध्या कोरोना संसर्ग असल्याने समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत साध्या पद्धतीने व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी हा दिवस साजरा केला.
शास्त्रीनगर येथील बुद्ध गार्डनमध्ये बुद्ध गार्डन संवर्धन विकास सेवा संस्थेच्या वतीने आर. आनंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गार्डनसाठी जागा दिलेल्या यशोदा जाधव व सुहास जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. महेंद्र कानडे, राजेंद्र कांबळे, संजय माळी, निशिकांत सरनाईक, दिगंबर लोहार उपस्थित होते.
शिवाजी पेठेतील प्रसाद तरूण मंडळातर्फे बुद्ध मूर्तीचे पूजन करून बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. यानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५४ जणांनी रक्तदान केले. यावेळी अमोल कुरणे, परेश बनगे, प्रतीक कुरणे, अक्षय साळवे, शरद कांबळे, अविनाश कांबळे दीपक चव्हाण, प्रथमेश कांबळे, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटोळेवाडी येथील भीमनगर हौसिंग सोसायटी येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. भालेराव, दिनेश पंडित, रमेश कामत, हरिचंद्र भालेकर, रमेश कांबळे, संदेश माने उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाज माध्यमावर भगवान गौतम बुद्ध : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तत्वज्ञानाचा उदगाता या विषयावर लेखक सुभाष थोरात यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
--
फोटो नं २६०५२०२१-कोल-बुद्ध जयंती
ओळ : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कोल्हापुरातील बुद्ध गार्डन येथे बुधवारी त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
---
२६०५२०२१-कोल-बुद्धजयंती ०१
ओळ : पाटोळेवाडीतील भीमनगर हौसिंग सोसायटी येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
--