कोल्हापूर : कोल्हापूरची सुवर्णकन्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिने गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा गुरुवारी सावंत कुटुंबीयांच्या घरी गुरुवारी दुपारी फटाके वाजवून व तिरंगा फडकावून जल्लोष केला.काही वर्षांच्या विश्रांतीनंतर तेजस्विनीने पुन्हा एकदा गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. तिसऱ्यांदा ती राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातर्फे सहभागी झाली आहे. तिने यापूर्वी सन २००६ मध्ये मेलबोर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल व पेअरमध्ये दोन सुवर्णची कमाई केली. सन २००९ मध्ये म्युनिच येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफ ल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदकाची, तर सन २०१० मध्ये म्युनिच येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीने सुवर्णपदक पटकावत भारतीय महिलांमध्ये अशी कामगिरी करणारी पहिली महिला ठरण्याचा बहुमान मिळविला. सन २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दोन रौप्य व कांस्यची कमाई केली. त्यानंतर पुन्हा एकदा सन २०१८ मध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली. या तिच्या यशाबद्दल गुरुवारी सकाळी तिच्या एस.एस.सी बोर्ड परिसरातील घरी तिची आई सुनीता व पती समीर दरेकर यांच्यासह नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष करत घरावर तिरंगा फडकाविला.देशासाठी आणखी पदक मिळवतेजस्विनीच्या आई सुनीता यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे गोल्डकोस्ट येथे संपर्क साधला. यावेळी माय-लेकींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी देशासाठी आणखी पदक मिळवून चांगली कामगिरी कर, असा आशीर्वाद त्यांनी दिला.राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकर हिने रौप्यपदक पटकावून देशाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असताना तिला मदतीचा हात दिला आणि तिने त्याचे चीज करून दाखविले. सातत्यपूर्ण कामगिरी हे तिचे वैशिष्ट्य आहे. ‘राष्ट्रकुल’मध्ये तिसºयांदा तिने प्रवेश करून रौप्यपदकाची मिळवून मोठे यश मिळविले.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्रीतेजस्विनीने देशासाठी आणखी चमकदार कामगिरी करत सन २०२० मध्ये होणाºया टोकिओ आॅलिम्पिकमध्येही अशीच सुवर्णमयी कामगिरी करत देशाचे व कोल्हापूरचे नाव जगभर करावे.-सुनीता सावंत,तेजस्विनीच्या आई
तेजस्विनीच्या कुटुंबीयांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:04 AM