लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : भारतात हवाई वाहतुकीची वाढ झपाट्याने होत असून, परदेशातील अनेक कंपन्या भारतात व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असून, त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. हवाई वाहतुकीची वाढ करायची असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वयाने काम केले पाहिजे, असे उद्गार केंद्रीय नागरी विमानोड्डाण खात्याचे मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी आधुनिकीकरण केलेल्या सांबरा विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.सध्या जगात सगळ्यात मोठी एअरलाईन कंपनी म्हणजे सामानाची वाहतूक करणारी कार्गो एअरलाईन आहे. कार्गोमुळे आर्थिक स्तरामध्ये सुधारणा होते. सध्या कर्नाटकात हवाई वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने ६२७ कोटी रु. मंजूर केले असून, त्याद्वारे राज्यातील विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे कार्य सुरू असल्याचेही पी. अशोक गजपती राजू यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी केंद्रीय रासायनिक खत आणि संसदीय खात्याचे मंत्री अनंतकुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे, इंधनखात्याचे मंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार सुरेश अंगडी, राज्यसभा सदस्य डॉ . प्रभाकर कोरे, महापौर संज्योत बांदेकर, आमदार संजय पाटील, भारतीय विमानपतन प्राधिकरणाचे अधिकारी रहेजा, आदी उपस्थिती होती. विमानतळासाठी संपादित जमिनींचा मोबदला काही शेतकºयांना मिळाला नसल्यामुळे शेतकºयांनी उद्घाटनप्रसंगी आंदोलन छेडण्याचे ठरविले होते; पण पोलिसांनी त्यांना विमानतळाच्या गेटवरच रोखले. भाजप आमदारांचा होर्डिंगवरील फोटो फाडला म्हणून काही भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.सांबरा विमानतळाच्या नूतनीकरणासाठी १४२ कोटी इतका खर्च आला आहे.विमानतळास राणी चन्नमाचे नाव द्याविमानतळास कित्तूर राणी चन्नमाचे नाव द्या, अशी मागणी बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी यावेळी केली. त्यांची केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांच्यासह सर्व भाजप लोकप्रतिनिधींनी समर्थन केले. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी संगोल्ली रायन यांचे नाव बेळगाव रेल्वेस्थानकास द्या, अशी मागणी केली. सध्या बेळगावहून मुंबई-बंगलोर ही विमानसेवा स्पाईस जेटकडून सुरू असून, हीच सेवा चेन्नईपर्यंत वाढविली जाईल, असे स्पाईस जेटने कळविले असून, केंद्रीय एटीसीकडून जेट ऐअरवेज आणि एअर इंडिगो या कंपन्यांनी स्लॉट मागितला आहे, अशी माहिती गजपती राजू यांनी दिली आहे.