शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

केंद्र सरकार दलितविरोधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : केंद्रातील सरकार हे दलित अथवा मुस्लिमाविरोधी नसून ते त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. देशाचा विकास करायचा असेल तर गावचा विकास होणे गरजेचे आहे़. मोदी सरकारकडून देशाचा विकास करण्यासाठी स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू आहे. येणाºया निवडणुकीत स्वाभिमानी व शिवसेनेने आमच्यासोबत राहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.हेरवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते़ हेरवाड येथील महिला शौचालय बांधकामाकरिता पंधरा लाखांचा निधी जाहीर करून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीने शासकीय योजना आपल्या गावात आणल्या पाहिजेत़ शासनाकडून घेतलेली कर्जे त्याच कामासाठी खर्च करून ते पैसे प्रामाणिकपणे परतफेड करा. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे २० लाखांपासून १५ कोटी रुपयेपर्यंतच्या योजना कार्यान्वित आहेत़ त्याचा लाभ सामान्यांनी घ्यावा़ सध्या देशामध्ये भाजप, सेना, आऱ पी़ आय़, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या युतीचे सरकार आहे़ २०१९ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आमच्यासोबत राहावे.प्रकाश आवाडे म्हणाले, अतुल चौगुले यांचे कार्य चांगले आहे़ ४ कोटी रुपयांची पेयजल योजना पूर्ण करून त्यांनी ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचे समाधानकारक काम केले आहे.़ स्वागत अतुल चौगुले यांनी केले़यावेळी जि. प़ सदस्य बंडा माने, डॉ़ अशोकराव माने, विजय भोजे, राहुल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डॉ़ संजय पाटील, मिनाज जमादार, सरपंच कल्पना मस्के, संगीता पाटील, राबिया विजापुरे, आर. बी. पाटील, मंगलराव माळगे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, विवेक कांबळे, दीपक भोसले, संजय शिंदे, जयपाल कांबळे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. जीवन कांबळे यांनी आभार मानले़मराठा आरक्षणासाठी कायदा करावामराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आऱ पी़ आय़ ची सर्वप्रथम मागणी आहे. याकरिता मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे़ मागील शासनाने १६ टक्के आरक्षण देऊ केलेले आहे़ त्यांना आमचा पाठिंबा आहे़ सध्या मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे़ मराठ्यांना आरक्षण मिळविण्याकरिता संसदेत कायदा करणे गरजेचे असल्याचे मंत्री आठवले यांनी विषद केले.