डान्स स्पोर्ट अर्थात नृत्य क्रीडाप्रकार होय. हा खेळ जेथे खेळला जातो त्यास ‘बॉलरूम’ असे म्हणतात. व्हीलचेअरवरील डान्स स्पोर्टमध्ये किमान एक स्पर्धक व्हीलचेअरमध्ये असणे आवश्यक आहे. डान्स स्पोर्टच्या स्पर्धा जागतिक डान्स स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने घेतल्या जातात. या खेळाची सुरुवात १९०९ साली पहिल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या रूपाने लंडन येथील आॅस्टोरिया बॉलरूममध्ये झाली. यामध्ये लंडनच्याच आॅलिव्ह रिपमन यांनी यात पहिला गु्रप तयार केला. हा खेळ प्रथम १९६० साली युरोप खंडात टी.व्ही.वर दाखविण्यात आला. विशेष म्हणजे या खेळाच्या प्रसारासाठी वर्ल्ड डान्स कौन्सिल (डब्ल्यूडीसी) ही नोंदणीकृत कंपनी व जी आंतरराष्ट्रीय बॉलरूम डान्सिंग कौन्सिलशी संलग्न आहे. या संघटनेची स्थापना १९५० मध्ये एडनबर्ग येथे करण्यात आली. वर्ल्ड सोशल डान्स स्पोर्ट कमिटी, ही सर्व प्रकारच्या डान्सतज्ज्ञांशी डान्स स्कूल व त्यातील शिक्षक यांच्याशी निगडित आहे. या असोसिएशनला आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेने मान्यता दिली आहे. १९५७ साली आंतरराष्ट्रीय कौन्सिल आॅफ अमॅच्युअर डान्स स्पोर्टस संस्थेचे रूपांतर २०११ साली ‘डब्ल्यूडीएसएफ’ या संस्थेमध्ये झाले. डान्स स्पोर्टस् अंतर्गत विविध डान्स स्पर्धा वय वर्षे १२-१६, १६-१९, २१-३५ अशा वयोगटांत खेळली जाते. हा खेळ इंटरनॅशनल स्टाईल व अमेरिकन स्टाईल या दोन्ही प्रकारांत खेळला जातो. त्यातही स्टँडर्ड, लॅटिन, अमेरिकन स्मूद, रिदम अशा प्रकारांत खेळले जातात. स्पर्धेची धून ही पूर्णत: गुप्त ठेवली जाते. स्पर्धेतील धून ही ठरावीक टेम्पो असलेली व कपल्स (जोडी) डान्ससाठी ९० सेकंदांपेक्षा कमी असू नये व दोन मिनिटांपेक्षा जास्त असू नये. शो डान्स टायटल्सव्यतिरिक्त लिफ्टस इतर प्रकारांत मान्य नाहीत. अंतिम फेरीत स्पर्धकांची चाचणी वेळ, फुटवर्क, उठ-बस करण्याची पद्धत, दिशा व फ्लोअर क्राफ्ट यांवर आधारित असते. स्पर्धकांना जागतिक अँटी डोपिंग एजन्सीच्या नियमांचे पालन करावे लागते. - संकलन : सचिन भोसले
शतकी परंपरा असलेला ‘डान्स स्पोर्ट
By admin | Published: August 07, 2015 11:52 PM