एकनाथ पाटील- कोल्हापूर -गतवर्षात गुन्हे रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीसांनी कसोसिने प्रयत्न केले असले, तरी घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांपुढे त्यांना हात टेकावे लागले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१४ अखेर ३५० घरफोड्यांसह, ८०२ चोऱ्या व चेन स्ॅनचिंगचे २२० गुन्हे पोलीस दप्तरी दाखल झाले. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घऊनचं घराबाहेर पडावे लागले. नवीन वर्षांतही चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलीसांना चॅलेंज दिले आहे. गतवर्षात खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, छेडछाड, अपहरण, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या गंभीर घटनांनी कळस गाठला. रात्री चोरी,घरफोडी तर दिवसा चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला. दिवसें-दिवस गुन्ह्यांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यातील व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गतवर्ष फारच चिंताजनक ठरले. खून, खुनाच्या प्रयत्नांनी तर कहरच केला. वर्चस्ववादातून खून, खुनाच्या प्रयत्नांच्या हल्ल्यांनी टोळीयुद्ध भडकले. विविध आंदोलनामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना लक्ष करून त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढले. अशाप्रकारचे ५० पेक्षा जास्त गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात मटका, जुगार, दारू, आदी अवैध व्यवसाय सरू नसल्याचा कांगावा करणाऱ्या पोलीसांनी खुद्द पोलीस दप्तरी दीड हजारांच्यावर गुन्हे दाखल केले. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराच्या घटनाही सुन्न करून गेल्या. अशी ७७ प्रकरणे गतवर्षी नोंद झालीे. याप्रकरणात झालेली वाढ सामाजिक स्वास्थ बिघडवणारीच आहे. महाविद्यालयीन तरुणींची छेडछाडीच्या प्रकारातही वाढ झाली. पोलीस प्रशासनाच्यावतीने दर महिन्याला क्राईम बैठक पोलीस मुख्यालयात घेतली जाते. गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा हे मार्गदर्शन करीत असतात. परंतु, त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी ही पोलीस ठाण्यांच्या पातळीवर होत नाही. बैठकीतले निर्णय, आश्वासने हे फक्त कागदावरच राहतात. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे बैठकीत हे प्रश्न उपस्थित केले जातात. नव्या वर्षाच्या सुरवातीलच चेन स्नॅचिंग, घरफोडी व हाणामारीचे गुन्हे नोंद झाल्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. वर्षातील चेन स्नॅचिंगचे गुन्हेजुनाराजवाडा २५, शाहूपुरी ३५, राजारामपूरी १५, करवीर १२, लक्ष्मीपुरी ४, शिरोली एमआयडीसी ४, गांधीनगर ३, गडहिंग्लज विभाग ९, इचलकरंजी ११, जयसिंगपूर ९, शाहुवाडी १२, कागल ४, गोकुळ शिरगाव ४.दाखल गुन्हे उघड गुन्हेखून : ६३५७खुनाचा प्रयत्न : ६५ ६४सदोष मनुष्य वध : ०३०३दरोडा : १८१७जबरी चोरी, चेन स्नॅचिंग : २०२१२४घरफोड्या : ३२९ ९९चोऱ्या : ८०२३०८गर्दी मारामारी : २६५२५९फसवणूक : २८२२३५सरकारी नोकरांवर हल्ला : ५१५० आत्महत्या : १६ १६बलात्कार : ७७ ७७विनयभंग : १५५१५५जुगार : ५००५००वर्षभरात जेवढे गुन्हे दाखल झाले, त्यापैकी बहुतांश गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना कडक सूचना दिल्या आहेत. - डॉ. मनोजकुमार शर्मा : पोलीस अधीक्षक
नव्या वर्षातही ‘चेन स्नॅचर्स’चे चॅलेंज
By admin | Published: January 06, 2015 11:53 PM