बँकेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून डिजिटायझेशनसह अनेक क्षेत्रात यश मिळविले आहे. ज्येष्ठांच्या अनुभव, मार्गदर्शनाचा बँकेच्या प्रगतीकरिता नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले. बँकेच्या व्यवसायाचे उद्दिष्ट सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही नूतन उपाध्यक्ष साळोखे यांनी दिली. मावळते अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या सभेस संचालक विकास परांजपे, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, वृषाली बंकापुरे, नंदकुमार दिवटे, ॲॅड. विवेक शुक्ल, केशव गोवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो (१३०५२०२१-कोल-माधुरी कुलकर्णी (पंचगंगा बँक), भालचंद्र साळोखे (पंचगंगा बँक)
===Photopath===
130521\13kol_7_13052021_5.jpg~130521\13kol_8_13052021_5.jpg
===Caption===
फोटो (१३०५२०२१-कोल-माधुरी कुलकर्णी (पंचगंगा बँक), भालचंद्र साळोखे (पंचगंगा बँक)~फोटो (१३०५२०२१-कोल-माधुरी कुलकर्णी (पंचगंगा बँक), भालचंद्र साळोखे (पंचगंगा बँक)