शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

सभापती-उपसभापती निवडी : प्रत्येक पंचायत समितीत राजकीय घमासान

By admin | Published: September 11, 2014 9:11 PM

निवडणुकीच्या तोंडावर बेरजेची ‘पंचायत’

रमेश पाटील - कसबा बावडाकरवीर पंचायत समिती सभापतिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता संपूर्ण करवीर तालुक्यात व ‘दक्षिणे’त लागून राहिली आहे. पाचगावच्या स्मिता गवळी, उचगावच्या पूनम जाधव व दिंडनेर्लीच्या सुवर्णा बोटे या तिघीजणी ‘रेस’मध्ये आहेत.सर्वसाधारण महिला गटासाठी हे पद आरक्षित आहे. पंचायतीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. पंचायत समितीत कॉँग्रेसचे १३, शेकापचे दोन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी, जनसुराज्य, स्वाभिमानी व अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे. कॉँग्रेसच्या १३ सदस्यांपैकी गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे त्यांच्याच दक्षिण मतदारसंघातील तब्बल नऊ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वी दक्षिणेतील सुवर्णा गुरव यांना सभापतिपदाची संधी दिली होती. त्यानंतर कळंब्याचे दिलीप टिपुगडे यांना संधी दिली. या दोन्ही निवडीवेळी पी. एन. पाटील गटाच्या दत्तात्रय मुळीक यांना उपसभापतिपद दिले होते. पुढील अडीच वर्षांसाठी सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. गृहराज्यमंत्री पाटील आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ‘दक्षिण’मधून सर्वाधिक मदत आपणास कोण करू शकेल, या निकषावर हे पद देण्याची शक्यता आहे. अशा निकषाचा जर विचार केला, तर सध्या स्मिता युवराज गवळी यांचेच पारडे जड वाटते.स्मिता गवळी, सुवर्णा बोटे, पूनम जाधव ‘रेस’मध्ये‘करवीर’ची खुर्ची कोणाला?रमेश पाटील - कसबा बावडाकरवीर पंचायत समिती सभापतिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता संपूर्ण करवीर तालुक्यात व ‘दक्षिणे’त लागून राहिली आहे. पाचगावच्या स्मिता गवळी, उचगावच्या पूनम जाधव व दिंडनेर्लीच्या सुवर्णा बोटे या तिघीजणी ‘रेस’मध्ये आहेत.सर्वसाधारण महिला गटासाठी हे पद आरक्षित आहे. पंचायतीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. पंचायत समितीत कॉँग्रेसचे १३, शेकापचे दोन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी, जनसुराज्य, स्वाभिमानी व अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे. कॉँग्रेसच्या १३ सदस्यांपैकी गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे त्यांच्याच दक्षिण मतदारसंघातील तब्बल नऊ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वी दक्षिणेतील सुवर्णा गुरव यांना सभापतिपदाची संधी दिली होती. त्यानंतर कळंब्याचे दिलीप टिपुगडे यांना संधी दिली. या दोन्ही निवडीवेळी पी. एन. पाटील गटाच्या दत्तात्रय मुळीक यांना उपसभापतिपद दिले होते. पुढील अडीच वर्षांसाठी सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. गृहराज्यमंत्री पाटील आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ‘दक्षिण’मधून सर्वाधिक मदत आपणास कोण करू शकेल, या निकषावर हे पद देण्याची शक्यता आहे. अशा निकषाचा जर विचार केला, तर सध्या स्मिता युवराज गवळी यांचेच पारडे जड वाटते.हातकणंगलेत घोडेबाजार जोरातसभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी : कोणत्याच पक्षाकडे बहुमत नाहीदत्ता बीडकर ल्ल हातकणंगलेहातकणंगले पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्यामुळे सभापतिपदासाठी कॉँग्रेस, जनसुराज्य आणि अपक्षांमध्ये कमालीची रस्सीखेच सुरू झाली आहे. २२ सदस्यांमध्ये कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे घोडेबाजार तेजीत आहे. तोडफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. पक्ष, निष्ठा, नेते आणि ध्येयधोरणे बाजूला ठेवून सभापतिपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. हातकणंगले पंचायत समितीच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कॉँग्रेसचे आठ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहा, जनसुराज्य पक्षाचे चार, भाजपचे तीन, शिवसेनेचे एक आणि अपक्ष एक, असे सदस्य निवडून आले होते. प्रथम अडीच वर्षांसाठी सभापतिपद सर्वसाधारण स्त्री-प्रवर्गासाठी आरक्षित होते. यावेळी कॉँग्रेसच्या आठ आणि राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी आघाडी करून कॉँग्रेसच्या आवाडे गटाच्या शुभांगी पाटील सभापती, तर राष्ट्रवादीच्या इंगवले गटाचे दीपक वाडकर उपसभापती अशी पदे दीड वर्षासाठी ठरवून दिली होती. मात्र, सभापती शुभांगी पाटील यांनी ठरल्याप्रमाणे वेळेत राजीनामा दिला नाही. तसेच निधीवाटपातील वादाने राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले. सभापती-उपसभापतींनी तीन महिने उशिरा राजीनामे दिले.नव्याने महिला सर्वसाधारण सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीचा सभापती, तर कॉँग्रेसचा उपसभापती या समीकरणाप्रमाणे राष्ट्रवादीच्या अरुण इंगवले गटाच्या शकुंतला चौगुले यांना सभापतिपदी संधी देण्याचे ठरले. मात्र, राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांमध्ये फूट पडून इंगवले गटाकडे तीन, तर माने गटाकडे तीन सदस्य याप्रमाणे विभागणी झाली. यावेळी राष्ट्रवादीचा इंगवले गट कॉँग्रेसबरोबर गेला, तर माने गटाने जनसुराज्य, भाजप-सेना आणि अपक्षाची मोट बांधत जनसुराज्यचा उपसभापती आणि राष्ट्रवादीच्या शुक्राना मकानदार यांना सभापती केले.सभापतिपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण खुले झाले आहे. कॉँग्रेसच्या आवाडे-आवळे-महाडिक गटाच्या आठ सदस्यांपैकी राजेश पाटील (हेर्ले) आणि मदन डाळे (घुणकी) यांनी सभापतिपदासाठी नेतेमंडळींकडे लॉबिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या इंगवले-माने गटांना एकत्र करून कॉँग्रेसचा सभापती आणि राष्ट्रवादीचा उपसभापती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, धैर्यशील माने गटाच्या तीन सदस्यांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळे कॉँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.जनसुराज्यकडून उपसभापती प्रदीप देशमुख यांना सभापती करण्यासाठी माजी आमदार राजीव आवळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप-सेना आणि अपक्षाबरोबर राष्ट्रवादीचे माने गटाचे चार सदस्य बेरजेला धरून सभापतिपद जनसुराज्यकडे, तर उपसभापतिपद आमदार हाळवणकर आणि धैर्यशील माने हे सांगतील त्यांना, असे धोरण ठरवून वाटचाल सुरू केली आहे.विलास कांबळे यांची निवड निश्चितभुदरगड : रतिपोर्णिमा कामत होणार उपसभापतीशिवाजी सावंत - गारगोटीभुदरगड पंचायत समितीचे सभापतिपद मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीचे एकमेव असे उमेदवार विलास कांबळे यांचे नाव निश्चित आहे. उपसभापती पदासाठी कॉँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तरीसुद्धा माजी आमदार दिनकरराव जाधव गटाच्या रतिपोर्णिमा कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये ३-१, तर पंचायत समितीत ४-४ असे समसमान बलाबल झाले. तेव्हा पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन अडीच-अडीच वर्षे सभापती, उपसभापती पदाचा फॉर्म्युला अवलंबला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या बाबा नांदेकर यांना संधी देण्यात आली. सव्वा वर्षांनंतर माजी आमदार बजरंग देसाई गटाच्या वैशाली घोरपडे यांना सव्वा वर्षांचा कार्यकाल मिळाला, तर उपसभापती पदासाठी प्रथम कॉँग्रेसच्या विजयमाला चव्हाण यांना सव्वा वर्षे, तद्नंतर राष्ट्रवादीच्या शिवाजीराव देसाई व सध्याचे उपसभापती विश्वनाथ कुंभार यांना नऊ-नऊ महिन्यांचा कालावधी मिळाला. गेल्या महिन्यात आरक्षण सोडत झाल्यानंतर सभापतिपदासाठी मागासवर्गीय पुरुष आरक्षण पडले. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलास कांबळे हे अडीच वर्षे सभापती राहणार, तर उपसभापतिपद हे कॉँग्रेसकडे जाणार असल्याने आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडे अडीच वर्षे उपसभापतिपद राहणार असल्याने सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला राबविला जाईल; पण पहिल्या टप्प्यात आपल्याला संधी मिळावी, यासाठी राजनंदा बेलेकर व रतिपोर्णिमा कामत यांच्यात चढाओढ आहे. आजऱ्यात पुन्हा केसरकरचज्योतिप्रसाद सावंत -आजराआजरा पंचायत समितीचे सभापतिपद इतर मागास प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्याने आजरा कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत केसरकर हे सत्तारूढ आघाडीतून एकमेव ‘पात्र’ ठरत असल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा रविवारी (दि. १४) होईल, असे चित्र आहे.सभापती पदाकरिता काँग्रेसच्या निर्मला व्हनवट्टे यादेखील इच्छुक आहेत. परंतु, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. सहापैकी चार सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. निवडणुकांनंतर केसरकर यांना सभापतिपदी संधी मिळाली होती. खुल्या प्रवर्गातून सध्या अनिता नाईक सभापतिपदी आहेत. विधानसभा निवडणुका असल्याने सभापती निवडीत कोणतीही गडबड होण्याची शक्यता नाही. केसरकर तालुक्याच्या राजकारणावर पकड असणारे नेते आहे. एकंदर परिस्थिती पाहता केसरकर यांची सभापतिपदी निवड निश्चित असून, पुन्हा एकवेळ त्यांना या पदावर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.शीला पाटील की सुवर्णा अपराज?शिरोळ सभापतिपदी कोण? : सव्वा-सव्वा वर्षासाठी संधी मिळणारगणपती कोळी - कुरुंदवाडशिरोळ पंचायत समितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व आहे. तसेच सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असून, या प्रवर्गातून निवडून आलेल्या शिरढोण मतदारसंघातील सदस्या शीला पाटील व हेरवाडच्या सुवर्णा अपराज या दोन्ही सदस्या ‘स्वाभिमानी’च्याच असून, दोघींंनाही संधी मिळणार असली तरी प्रथम कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१६ सदस्यांपैकी आठ स्वाभिमानी, दोन अपक्ष व सहा सदस्य कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले सुशील कांबळे व अश्विनी कांबळे हे दोघेजण ‘स्वाभिमानी’ला मिळाले असून, त्यांना उपसभापतिपद देण्यात आले आहे. अडीच वर्षांनंतर सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गातील दोन्हीही महिला स्वाभिमानीच्या आहेत. त्यामुळे निवडीसाठी विरोधकांची राजकीय खेळीही चालणार नाही, हे निश्चित आहे. सव्वा वर्षाचा कालावधी देऊन दोघींनाही संधी मिळणार असली, तरी प्रथम संधी मिळावी, यासाठी खा. शेट्टी यांच्याकडे ताकद लावत आहेत. ‘स्वाभिमानी’ने अद्याप कोणाचेही नाव जाहीर केले नसले, तरी सभापतिपद प्रथम कोण पदरात पाडून घेतो, याची उत्सुकता आहे. नाईकवाडी, पाटील यांची नावे आघाडीवरचंदगड : विधानसभेसाठी गोळाबेरीज होणारनंदकुमार ढेरे -चंदगडचंदगड पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून, या पदासाठी हसीना नाईकवाडी किंवा नंदिनी पाटील यांची वर्र्णी लागण्याची शक्यता आहे. पंचायत समितीमध्ये माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व नरसिंगराव पाटील गटाची सत्ता आहे. मात्र, या गटाकडे सर्वसाधारण महिला उमेदवार नसल्याने सभापतिपद सर्वसाधारण पदासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी एकही महिला उमेदवार नाही. मात्र, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून माजी आमदार भरमूअण्णा पाटील हे माजी पंचायत समिती सदस्य शहाबुद्दीन नाईकवाडी यांच्या पत्नी हसीना नाईकवाडी किंवा माजी सभापती के. बी. पाटील यांच्या सुनबाई नंदिनी पाटील यांना आपल्या गटात घेऊन त्यांना सभापतिपद देण्याची शक्यता आहे. तर उपसभापतिपदासाठी शांताराम पाटील यांची वर्र्णी लागण्याची शक्यता आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेसप्रणीत माजी मंत्री भरमू पाटील गटाचे शांताराम पाटील, निंगू गुरव, विद्यमान उपसभापती बबन देसाई. माजी आमदार नरसिंगराव पाटील गटाचे अनिल सुरुतकर, तुळसा तरवाळ व विद्यमान सभापती ज्योती पवार-पाटील, तर राष्ट्रवादीच्या नंदिनी पाटील, अनुराधा पाटील, कल्लाप्पा नाईक, हसीना नाईकवाडी आहेत. अनुसया सुतार, रजनी नाईक यांच्यात रस्सीखेचगडहिंग्लज पंचायत समिती : उपसभापतिपदी तानाजी कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यताराम मगदूम ल्ल गडहिंग्लजगडहिंग्लज पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. सभागृहात एकूण पाच महिला सदस्य असून, दोघींना उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे. उर्वरित तिघींना किंवा पाचही जणींना सभापतिपदाची संधी वाटून दिली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात अनुसया बाळकू सुतार, रजनी विजय नाईक यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.तथापि, सुतार, नाईक व सरिता प्रकाश पाटील या तिघींना अद्याप संधी मिळालेली नाही. तिघींचीही नावे चर्चेत असली तरी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पूर्वभागाला प्राधान्य देण्यासाठी सुतार यांना पहिली संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. उपसभापतिपदी तानाजी कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. गडहिंग्लज पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत आहे. सभागृहातील दहा पैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे, तर जनता दल व जनसुराज्यचा प्रत्येकी एक सदस्य असून, सभापती निवडीचे सर्वाधिकार आमदार संध्यादेवी कुपेकर व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेच आहेत.पहिल्या टप्प्यात सभापतिपदही खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित असल्यामुळे त्याठिकाणी अनुक्रमे इकबाल काझी व अमर चव्हाण यांना संधी देण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी, महागाव व नेसरी हे चार जि. प. मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघात, तर कडगाव-कौलगे हा एकमेव मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे सभापतिपद चंदगडकडे, तर उपसभापतिपद कागलकडे असे अलिखित सूत्रच ठरून गेले आहे. सभागृहातील पाचही महिला सदस्या राष्ट्रवादीच्याच आहेत. त्यापैकी कडगाव-कौलगेमधून निवडून आलेल्या मीना सदानंद पाटील व स्नेहल शंकर गलगले यांना पहिल्या टप्प्यातच उपसभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात उपसभापतिपद कोणाकडे, याकडेही तालुक्याचे लक्ष आहे.उपसभापतीच होणार सभापतीएम. ए. शिंदे ल्ल साळवणगगनबावडा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे सध्या उपसभापती असलेले तानाजी पाटणकर यांची वर्णी सभापतिपदावर लागणार आहे.चार सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. निवडणुकीनंतर कॉँग्रेसच्या सविता कोटकर यांची सभापतिपदी निवड झाली होती. सव्वा वर्षांच्या कार्यकालानंतर शालिनी शेळके यांची सभापतिपदी निवड झाली. सविता कोटकर आणि शालिनी शेळके यांनी सभापतिपद भूषविले असल्यामुळे उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे बाळासाहेब कांबळे यांना सधी मिळून पुन्हा एकदा समझोता एक्स्प्रेस धावणार काय, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पन्हाळ्यात समान जागांमुळे चिठ्ठीद्वारे होणार निवडकिरण मस्कर ल्ल कोतोलीपन्हाळा पंचायत समिती सभापतिपद खुल्या प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव असून, कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथे दोन्ही गटांचे समान बलाबल असल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवड होणार आहे. सभापती संजय चावरेकर यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा राहिलेल्या सव्वा वर्षासाठी वाघवे पंचायत समिती सदस्या लता अशोक साठे यांना संधी द्यावी, असे सभापतिपद निवडीवेळी ठरले होते; पण सव्वा वर्षानंतर चावरेकर यांनी राजीनामा न दिल्याने साठे या नाराज असून, या नाराजीवरून सहाजणांच्या आघाडीत बिघाडी होऊ शकते. येथे शिवसेना-३, काँग्रेस - २ व राष्ट्रवादी-१ असे बलाबल असून, जनसुराज्य पक्षाचे ६ सदस्य आहेत. या आघाडीकडून विद्यमान उपसभापती सुवर्णा पाटील या सभापतिपदासाठी उत्सुक आहेत. त्यांना सभापतिपद मिळावे, यासाठी आमदार चंद्रदीप नरके, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व काँग्रेसचे अमर पाटील प्रयत्न करीत आहेत, तर जनसुराज्यकडून सुनीता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. जनसुराज्य पक्षाने आपल्या पक्षाचा सभापती असणार, असा दावा केला आहे, तर आघाडीमध्येच सभापतिपद राहील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दोन्ही गटांचे पक्षबल समान असून, चिठ्ठी टाकूनच मतदान घ्यावे लागणार आहे.