ज्योतीप्रसाद सावंत -आजराजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरिता आजरा तालुक्यातून आजरा साखर कारखान्याचे दोन माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी व अशोक चराटी परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अत्यंत चुरशीने ही लढत होत असून, ठरावधारकांचे उखळ पांढरे होत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आजरा तालुक्यात नेहमीच चुरशीची ठरत आली आहे. गत निवडणुकीत जयवंतराव शिंपी, काशिनाथअण्णा चराटी यांच्यासह अनेक मंडळींनी एकत्र येऊन राजारामबापू देसाई यांच्याविरुद्ध मोट बांधली. व्यक्तीविरोधातून झालेल्या राजकारणात राजारामबापूंचा पराभव झाला. काशिनाथअण्णा विजयी झाले.यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. जयवंतराव व अशोकअण्णा दोघेही राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आघाडीतून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, हाही प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना अशोकअण्णांनी विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांना केलेली उघड मदत, ‘बिद्री’ कारखान्याच्या निमित्ताने आमदार आबिटकर व के. पी. पाटील यांच्यात उफाळून आलेला संघर्ष याचा विचार केल्यास अशोकअण्णांनाच अडचणीत आणण्याचे प्रयत्न होणार आहेत.के. पीं.चा होणारा संभाव्य विरोध व के. पी. समर्थक स्थानिक मंडळींचा विरोध गृहीत धरूनच अशोकअण्णांनी मोर्चेबांधणी केली आहे. या आठवडाभरात जिल्हा बँकेचे चित्र स्पष्ट होत असून, अत्यंत काठावरचे मतदान होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही उमेदवारांकडून आपापल्या गटाचे ठरावधारक सहलीवर पाठविले आहेत.जे ठरावधारक सहलीवर गेलेले नाहीत, त्यांच्यासाठी ही निवडणूक लॉटरी ठरत आहे. त्यांना खुली आॅफर ठरावधारकांना दिली जात आहे. ी. पेठवडगाव केंद्रावरही सत्ताढला १७०, तर परिवर्तनला ४५ मते मिळाली. हाच मताधिक्याचा कल विजयासाठी अधिक कारणीभूत ठरला. १०२ ते ३०० पर्यंतचे मताधिक्य सत्तारूढला मिळाले. या गावांनीच सत्तारूढचा विजय सोपा केला.
चुरशीच्या लढतीने ठरावधारकांचे उखळ पांढरे
By admin | Published: April 23, 2015 12:50 AM