शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

विस्कटलेली घडी सावरण्याचे आव्हान

By admin | Published: May 19, 2015 7:20 PM

इचलकरंजी नगरपालिका : नागरी हितासाठी सर्वांचा गळ्यात गळा; लोकप्रतिनिधींपेक्षा प्रशासनच वरचढ

राजाराम पाटील -इचलकरंजी -नागरिकांच्या हितासाठी इचलकरंजीत सर्व एकत्र आले. सुरुवातीला आढेवेडे घेणाऱ्यांनीही गळ्यात गळा घातला. प्रंतु, लोकप्रतिनिधींपेक्षा आता प्रशासनच वरचढ ठरू पाहत असल्याने नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा सावरण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षश्रेष्ठींसमोर उभे ठाकले आहे.येथील नगरपालिकेच्या राजकारणात जानेवारी महिन्यापासून सर्वच एकत्रित आले. राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी एकत्रित येऊन कारभार हाकला जाऊ लागला. त्याप्रमाणे राजकीय मतभेद बाजूला राहावेत, गटातटाचे राजकारण न करता ‘अवघेची धरू सुपंथ’ असे कामकाज सुरू झाले. नवीन कारभारी उत्साहाने कामाला लागले.मात्र, गेल्या तीन वर्षांत नगरसेवक, त्यांच्या प्रभागातील विविध कामे, त्यावर सभापती किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचे असलेले नियंत्रणच राहिले नाही. सर्वच खात्यांच्या कामकाजात ‘ज्याच्या हाती शिकार, तो पारधी’ अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत सातत्याने वेळ देणाऱ्या व काही मातब्बरांनी कामे करून घेतली. याच स्थितीचा प्रशासन व मक्तेदारांनी फायदा उचलला.गेल्या वर्षभरापासून मोठ्या निविदा मागणीवर भर राहिला. सभापती व अन्य नेते त्यामध्ये मश्गुल राहिले. मग प्रशासनालाही किरकोळ कामात रस राहिला नाही. इकडे लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुसीचा नेमका फायदा प्रशासनाने उचलला. कामकाजात गोंधळ उडाला आणि घडी विस्कटली. आता विस्कटलेली घडी कोण आणि कशी बसविणार, याचीच विवंचना जाणकार नागरिकांना आहे.वार्षिक मक्त्यातले ‘मानकरी’‘वार्षिक मक्ता’ या नावाखाली काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात रस्ते सुद्धा करून घेतले, तर बांधकाम खात्याकडील एक उच्चपदस्थाने लोकप्रतिनिधींनाच अंधारात ठेवून परस्पर कामे केली. अशी कोट्यवधींची कामे झाल्याचे आता निदर्शनास येत आहे. तर त्यामध्ये दोघा मक्तेदारांनी पुढाकार घेतला आणि प्रशासनातील कनिष्ठ-वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरीत मोठा ढपला पाडल्याची चर्चा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.शाळांची झाडलोट ‘२४ लाखांची’शहरात एकूण ४२ ठिकाणी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती आहेत. त्यातील काही इमारती खासगी शाळांना भाडेतत्त्वावर दिल्या असून, उर्वरित शाळांची झाडलोट करण्याचा वार्षिक २४ लाखांचा ठेका दिला आहे. शाळांची झाडलोट व साफसफाईच्या नावाने आनंदी-आनंदच आहे, हे सुजाण नागरिकांना माहीतच आहे. मात्र, झाडलोट केल्याची रक्कम दर महिन्याला उचलली जाते, याचीही चौकशी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.