कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : गेल्या लोकसभा निवडणुकीत आजरा तालुक्यातून खासदार धनंजय महाडिक यांना मताधिक्य मिळाले होते. सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना वातावरण अनुकूल असून हीच परिस्थिती निवडणुकीपर्यंत राहिल्यास खासदार महाडिक यांच्यासमोर मताधिक्य टिकविण्याचे आव्हान राहणार आहे.राजकीय परिस्थिती विचित्र बनल्याने कुणाला मदत करायची या संभ्रमावस्थेत आजऱ्यातील नेतेमंडळी आहेत. वैयक्तिक मानणाऱ्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानंतरच निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मात्र, म्हणावे तितके राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय दिसत नाहीत.आजºयात राष्ट्रवादीचे सदस्य जयवंतराव शिंपी यांचा कल प्रा. मंडलिक यांच्याकडे आहे. उत्तूरमध्ये सदस्य उमेश आपटे काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानून काम करत असल्याने आपटे यांचीप्रा. मंडलिक यांनाच रसद मिळण्याची शक्यता आहे. कोळींद्रे मतदारसंघातील सदस्या सुनिता रेडेकर व उद्योजक रमेश रेडेकर हे भाजपचे असल्याने त्यांची ताकदही प्रा. मंडलिक यांनाच मिळू शकते. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय होण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या बैठकीत कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांच्याविरोधात पाढा वाचला आहे. आजरा जि. प. मतदारसंघात आमदार प्रकाश आबीटकर यांची टीम मंडलिक यांच्यासाठी राबताना दिसत आहे. आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांचा पक्षाचा आदेश मानून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, वसंतराव धुरे, उदयराज पोवार आदी मंडळींनी सक्रियतेने काम केल्यास बॅकपूटवर गेलेले खासदार महाडीक आघाडीवर येऊ शकतात.आजरा कारखाना अध्यक्ष अशोक चराटी मंडलिक यांना मदत करायची की नाही या संभ्रमावस्थेत आहेत. कारखाना संचालक विष्णूपंत केसरकर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत मंडलिक यांनाच होण्याची शक्यता आहे. ‘गोकूळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची पूर्ण ताकद महाडीक यांच्यासोबत राहणार आहे.लोकसभेत ‘आमदार’कीची तयारीराधानगरी, भुदरगड व आजरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून विधानसभेची तयारी करून घेत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, सत्यजित जाधव, आमदार प्रकाश आबीटकर व अर्जुन आबीटकरांची टीम, जीवन पाटील, आदीजण आजरा जि. प. मतदारसंघात फिरताना दिसत आहेत.
महाडिकांना मताधिक्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:07 AM