साळवण : गगनबावडा तालुक्याच्या हद्दीत भुईबावडा घाटात जंगलामध्ये शॅमेलिऑन जातीचा सरडा आढळून आला. त्याला ‘हरण सरडा’ असेही संबोधले जाते.हा ‘शॅमेलियन’ झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल, तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते. याबाबतची अधिक माहिती पर्यावरणप्रेमी डॉ. अमित पाटील यांनी दिली.
Kolhapur: गगनबावड्यात आढळला 'शॅमेलिऑन' जातीचा सरडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:00 PM