कोल्हापूर : जिल्ह्यात आज, सोमवार पासून पावसाळी वातावरण राहणार आहे. बुधवार व गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानातही घट होणार असून कमाल तापमान ३२ डिग्रीपर्यंत खाली येणार आहे.जमिनीपासून साधारण ३ ते ७.५ किलो मीटर साडेचार किलो मीटर हवेच्या जाडीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्यप्रदेश पासून उत्तर प्रदेशापर्यंत त्या पातळीतून जाणाऱ्या हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेच्या संयोग व उरध्वगामितेमुळे इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे आजपासून पाच दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः बुधवार ते शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता अधिक आहे.पावसाळी हवामानामुळे या आठवड्यात कमाल तापमानात २ ते ४ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार तुरळक सरी कोसळणार आहेत.
असे राहील तापमान, डिग्रीमध्ये :वार -किमान - कमालसोमवार - २१ - ३२मंगळवार - २० - ३१बुधवार - २१ - ३०गुरुवार - २० - ३०