शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

कोल्हापुरात आठवडाभर गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:54 PM

कोल्हापूर : मुंबई, संपूर्ण कोकण वगळता कोल्हापूरसह राज्यातील २९ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित ...

कोल्हापूर : मुंबई, संपूर्ण कोकण वगळता कोल्हापूरसह राज्यातील २९ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.राज्यातील २९ जिल्ह्यांत रविवार, दि. १२ मेपासून त्यापुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. गडगडाटासह विजा, वारा, गारा आणि धारांची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. या पाच दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांत मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत सरासरीइतके म्हणजे ३५ आणि २५ डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यानचे कमाल आणि किमान तापमान राहणार असून तेथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस यांसारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नाही. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही.शिवाय ढगाळ वातावरण आणि काहीशा वारा वहनातून २९ जिल्ह्यांत दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान ४० ते ४३ डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यान म्हणजे सरासरीइतके किंवा क्वचितच एक ते दोन डिग्री सेल्सिअस ग्रेडने अधिक जाणवेल. त्यामुळे उन्हाचा विशेष चटका जाणवणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसTemperatureतापमान