कोल्हापूर : वर्षापूर्वी सोनतळी (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्याप्रकरणी शिमोगा-कर्नाटक येथील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
संशयित सद्दाम व बागजान अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा चंदन दरोड्यामध्ये सहभाग काय होता, याची सखोल चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात सातजणांना अटक केली आहे. आणखी पाच संशयितांचा समावेश आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.चंदन दरोड्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित महंमद समीउल्ला अब्दुलरशीद शेख व मोहंमद रफिक मोहंमद समीउल्ला शेख (दोघे रा. शिमोगा, कर्नाटक) यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली आहेत.
त्यांचेकडे सुरू असलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सद्दाम व बागजान यांचाही गुन्ह्यात सहभाग असलेची कबुली दिली. संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्सवरूनही पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागत आहेत.