चंदगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतींपैकी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १५३ व्यक्तींनी १५४ अर्ज, तर आजअखेर एकूण १६९ व्यक्तींनी १७१ अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.
अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायती : दाटे ९, तुडये १२ व्यक्ती १३ अर्ज, हलकर्णी ५, कालकुंद्री १, कोवाड १३, बसर्गे १४, दिंडलकोप ३, राजगोळी बुद्रुक १, करेकुंडी ५, बुक्कीहाळ ४, कळसगादे ९, पाटणे ४, इब्राहिमपूर १, हाजगोळी २०, नागवे ५, होसूर ३, शिनोळी खुर्द २३, बागिलगे ७, नांदवडे ६, आसगाव १, देवरवाडी ७ अशा २१ ग्रामपंचायतींच्या १५३ उमेदवारांनी आज दिवसभरात १५४ अर्ज दाखल केले आहेत.
२० ग्रामपंचायतींच्या उमेदवारांनी अद्याप एकही अर्ज दाखल केलेला नाही. धुमडेवाडी, मलतवाडी, तावरेवाडी, ढोलगरवाडी, म्हाळेवाडी, किटवाड, कानडी या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.