चंदगड : पोलिस निरीक्षकांना मारण्याकरिता अंगावर धाऊन जाऊन त्यांना शिवीगाळ करत धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चंदगडपोलिसात एका वकिलाच्या विरोधात सोमवारी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ॲड. संतोष मळवीकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी पोलिस ठाण्याच्या आवारात तक्रार देण्यास आलेल्या लोकांची भांडणे मिटविण्यासाठी व आरोपी मळवीकर यांच्या ओळखीच्या कुंदेकर यांच्या संपलेल्या शस्त्र परवानाबाबत तडजोड करावी लागते यासाठी मध्यस्थी करण्याकरिता आले असता त्यांना तुम्ही पोलिस ठाण्याच्या आवारात कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही. ज्यांची तक्रार आहे त्यांनी थेट पोलिस ठाण्यात येऊन तक्रार करावी, असे सांगत असताना फिर्यादीने पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच आरोपींने फिर्यादी पोलिस निरीक्षक पाटील यांच्यावर अरेरावी करत एकेरी भाषा वापरून त्यांना मारण्याकरिता अंगावर धाऊन जाऊन शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी मळवीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur: वकिलाने पोलिस निरीक्षकांना शिवीगाळ करून दिली धमकी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:16 IST