चंदगड : चंदगड तालुक्यातील फिरायला गेलेल्या बारा युवकांना लुटल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संबधित स्पामधील आणखीन दोन महिलांना ताब्यात घेतले. याप्रकरणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आज, मंगळवारी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी म्हापसा पोलिस स्थानकाला भेट देऊन पोलीस निरीक्षक परेश नाईक यांना याप्रकरणी कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या.चंदगड तालुक्यातील बारा युवक सोमवार (दि. २३ मे) रोजी गोव्याला फिरायला गेले होते. दुसऱ्या दिवशी परत येत असताना म्हापसा बोर्डेश्वर मंदिराजवळील एका स्पामधील चार ते पाच अज्ञातांनी सदर बारा युवकांना लुटले होते. तसेच त्यांना बेदम मारहाण करुन त्यांचे नग्न व्हिडिओही बनवले होते.पाचही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडीयाप्रकरणी रविवारी म्हापसा पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक परेश नाईक व त्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ सचिन भारद्वाज, मुबारक मुल्ला व आशिष जागिर सिंग या तिघांना अटक केली होती. त्यानंतर आज सदर स्पामधील आणखीन दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाचही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.फरार महिलेचा शोध सुरूयातील एक महिला फरार असून शोध सुरू आहे. तत्पूर्वी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट दिली. या प्रकरणी तपासात कोणतीही हयगय न करता दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना केली.अनेक पीडितांना न्याय मिळणारगोवा सरकारने याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. तसेच पोलीस निरीक्षक नाईक यांनीही कसून चौकशी सुरू ठेवली असल्याने चंदगड तालुक्यातील युवकांसोबतच अनेक पीडितांना न्याय मिळणार असल्याने अँड. संतोष मळविकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चंदगडमधील युवकांना मारहाण प्रकरण: गोव्यातील आणखीन दोन महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 6:52 PM