शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

चंदगड, राधानगरी, हातकणंगलेतील मतदान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 5:50 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचंदगड, राधानगरी, हातकणंगलेचे मतदान घटले: स्थलांतर, मयत, दुबार आदींमुळे नावे झाली कमी इतर सात विधानसभा मतदारसंघांत मतदान वाढले : अंतिम मतदार यादीतील माहिती

प्रवीण देसाईकोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे तर उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांत मतदारयाद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान काही हजारांमध्ये वाढले आहे. या कार्यक्रमांतर्गत स्थलांतर, दुबार नावे आदी कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याने मतदान पूर्वीपेक्षा काही प्रमाणांत कमी झाल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनाकांवर आधारित दि. १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत मतदार याद्या पुनर्रिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये नावनोंदणीसह नाव वगळणीचे ही अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये मृत, दुबार व स्थलांतरीत अशी नावे कमी झाल्याने चंदगड, राधानगरी, हातकणंगले मतदारसंघांतील मतदान घटले आहे.

चंदगडमध्ये पूर्वी ३ लाख १९ हजार २४६ इतके मतदान होते. ते आता ३ लाख १८ हजार ९१३ इतके झाले आहे. राधानगरीचे पूर्वी मतदान ३ लाख २६ हजार ३०८ इतके होते, ते आता ३ लाख २५ हजार ५३८ झाले आहे तर हातकणंगले मतदारसंघातील पूर्वी मतदान ३ लाख १८ हजार २४५ इतके होते, ते आता ३ लाख १७ हजार ६६८ इतके झाले आहे; तर वाढलेल्या मतदानामध्ये कागलमधील पूर्वीचे मतदान ३ लाख २१ हजार २६५ इतके होते ते आता ३ लाख २२ हजार ४६९, कोल्हापूर दक्षिणमध्ये पूर्वी ३ लाख २२ हजार ५७६ होते, ते आता ३ लाख २४ हजार ३६७, करवीरमध्ये पूर्वी ३ लाख २ हजार १३९ होते ते आता ३ लाख ३१ हजार ७७, कोल्हापूर उत्तरमध्ये पूर्वी २ लाख ८३ हजार ८८५ होते, ते आता २ लाख ८५ हजार ४४७, शाहूवाडीमध्ये पूर्वी २ लाख ८७ हजार ४१९ होते, ते आता २ लाख ८७ हजार ४४७, इचलकरंजीमध्ये पूर्वी २ लाख ९३ हजार १९६ इतके होते, ते आता २ लाख ९३ हजार २४३, शिरोळमध्ये पूर्वी ३ लाख १० हजार ८९९ इतके होते, ते आता ३ लाख १२ हजार ३९१ इतके झाले आहे.

साडेपाच हजार मतदान वाढलेअंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन यामध्ये जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत ३० लाख ९० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये तीन मतदारसंघातील घटले असून उर्वरीत सात मतदारसंघांतील मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतदानामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ हजार ४८५ मतदानाची भर पडली आहे. पूर्वी जिल्ह्याचे मतदान ३ लाख ८५ हजार १७८ इतके होते. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर