सरुड : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण हे उद्या, गुरुवार दि. ३० डिसेंबर ते १ जानेवारी अखेर तीन दिवस पर्यटनासाठी बंद असणार आहे, अशी माहिती चांदोली अभयारण्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व चांदोली धरण प्रशासनाचे शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांनी दिली.३१ डिसेंबरचे औचित्य साधून अनेक पर्यटक चांदोली राष्ट्रीय उद्यान व चांदोली धरण परिसराला भेट देत असतात. यावेळी पर्यटक याठिकाणी पार्ट्याचे आयोजन करतात. तसेच हुल्लडबाजी करतात. याचा येथील पर्यावरणाला व वन्यजीवांना तसेच त्यांच्या आश्रयस्थळांना धोका पोहोचतो. त्यामुळे या कालावधीमध्ये घडणारे हे प्रकार टाळण्यासाठी या दोन्ही परिसरात उद्या पासून १ जानेवारी पर्यंत तीन दिवस पर्यटंकाना प्रवेश बंदी असणार आहेत. २ जानेवारी पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण तीन दिवस पर्यटकांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 3:06 PM