अनिल पाटीलसरुड : चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटाकांसाठी शनिवार (दि १५) पासून खुले करण्यात आले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात निसर्ग पर्यटनासाठी दरवर्षी वाढत असलेली पर्यटंकाची गर्दी लक्षात घेऊन यापुढे चांदोलीतील पर्यटनासाठी पर्यटकांना प्रवासासाठी वनविभागाकडून १७ आसन क्षमतेची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रति पर्यटक १५० रु. तर लहान मुलांसाठी ५० रु प्रवास शुल्क घेवून वन विभागाकडून पर्यटाकांना या बसमधून जंगल सफारी घडवून आणली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही बस एक पर्वणीच ठरणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर ३१७. ६७ चौरस कि. मी मध्ये पसरलेले चांदोली हे राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. २००४ मध्ये या अभयारण्याची राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा मिळाला तर मे २००७ मध्ये या उद्यानास राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले. दरवर्षी १५ जुन ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत पावसामुळे उद्यान पर्यटनासाठी बंद ठेवले जाते.विशेषतः जानेवारी ते मे अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये निसर्ग पर्यटनासाठी या चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची मोठी गर्दी असते. यावर्षी १६ ऑक्टोंबरला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते जंगल सफारी बसला हिरवा झेंडा दाखवून तसेच शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक नानासाहेब लडकत, चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी, सहाय्यक वन संरक्षक गणेश पाटोळे व तुषार ढमढेरे, चांदोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नंदकुमार नलवडे आदीसह वन विभागाचे कर्मचारी उपस्थितीत होते .विविध प्रजातींच्या प्राण्यांसह, पक्षांचे वास्तव्यचांदोली राष्ट्रीय उद्यानात ३३ प्रजातीचे सस्तन प्राणी, २४४ प्रजातींचे पक्षी, १२० प्रजातींची फुलपाखरे, २२ प्रजातींचे उभयचर प्राणी, ४४ प्रजातींचे सरपटणारे प्राणी आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. तर १४५२ प्रकारच्या विविध वनस्पती व ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती या उधानात आढळून येतात. तर ऐतिहासिक प्रचितगड हा किल्लाही याच उद्यानात आहे
चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले, जंगल सफारीसाठी वनविभागाकडून बसची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 5:02 PM