शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

सभेत घुसणारे ‘चंद्रदीप’च ‘हिरो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:54 AM

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी गटाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले असले, तरी रविवारी झालेल्या वादळी सभेचे हिरो मात्र आमदार चंद्रदीप नरकेच झाले. सभागृहात आत सोडण्यापासून ते सभास्थळी धाडसाने घुसण्यापर्यंत नरके यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभामंडपात त्यांना कोण रोखू शकले नाही.वॉटर पार्क येथून दोन हजार कार्यकर्त्यांसह ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी गटाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले असले, तरी रविवारी झालेल्या वादळी सभेचे हिरो मात्र आमदार चंद्रदीप नरकेच झाले. सभागृहात आत सोडण्यापासून ते सभास्थळी धाडसाने घुसण्यापर्यंत नरके यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभामंडपात त्यांना कोण रोखू शकले नाही.वॉटर पार्क येथून दोन हजार कार्यकर्त्यांसह विरोधक ताराबाई पार्क येथील सभास्थळी आले. विरोधक येण्यापूर्वीच सभामंडप हाऊसफुल्ल झाल्याने विरोधी नेते आक्रमक झाले होते. त्यांनी आम्हाला बसण्यासाठी जागा द्या, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली, पोलीस अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सर्वच नेते आक्रमक झाले; पण सगळ्या नेत्यांत आमदार नरके फारच आक्रमक झाले होते. गेटवर घेतलेल्या सभेतही त्यांनी सत्तारूढ गटाच्या नेत्यांसह संचालकांचे वाभाडे काढले. त्यानंतर आत सोडण्यासाठी इतर नेत्यांबरोबरच नरके यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोलिसांना न जुमानताच आत प्रवेश केला आणि थेट सभास्थळ गाठले. हजारांचा मॉब असल्याने त्यात घुसणे तसे जोखमीचे होते; पण आक्रमक नरके त्यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक, के. पी. पाटील हे सभेत घुसल्याने कमालीचा तणाव निर्माण झाला. नरके यांचे स्वीय सहायक युवराज माने सर्वांत पुढे होते. त्यांच्यापाठोपाठ आमदार नरके, अजित नरके पुढे आले. नेत्यांनी व्यासपीठाकडे आगेकूच सुरू केल्याने तणाव वाढत गेला. या गोंधळातच नरके आक्रमक झाले. व्यासपीठावरून अध्यक्ष पाटील माईकवरून मंजूर मंजूर म्हणत होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी आमदार नरके यांना खांद्यावर उचलून घेतल्याने ना मंजूर... ना मंजूर... करत घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘गोकुळ’ विरोधातील लढाईचे सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी नेतृत्व केले असले तरी रविवारच्या सभेत चंद्रदीप नरकेच हिरो ठरले अशी चर्चा सभास्थळी होती.नरके आक्रमक का झाले?चंद्रदीप नरके यांच्या आक्रमतेमागे करवीर मतदारसंघातील राजकारण होते. हे जरी खरे असले तरी सभेच्या ठिकाणी करवीर, पन्हाळा, शाहूवाडीतील ठरावधारक संख्येने जास्त होते. ते नरके व त्यांचे बंधू अजित नरके यांनाही मानणारे असल्याने अनेक सभासदांनी त्यांना वाट करून दिली. त्यांच्याऐवजी अन्य दुसरे नेते असते तर कदाचित विरोध झाला असता. शिवाय नरके आमदार असल्याने त्यांना थांबा म्हणणे पोलिसांनाही शक्य झाले नाही.हाच्च्या राखू नका, घुसापोलिसांनी रोखल्याने आतजायचे की नाही? या मन:स्थितीत विरोधी नेते होते; पण सभास्थळाच्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार नरके यांनी आत जाण्याचा आग्रह धरला. हाच्च्या राखू नका, घुसा, अशी हाक देत नरके पहिल्यांदा आत घुसले.मोट बांधली... : मल्टिस्टेटसह एकूणच कारभाराला आमदार सतेज पाटील यांनी विरोध दर्शवत ‘गोकुळ’ विरोधात रणशिंग फुंकले. सुरुवातीला ते एकाकी झुंज देतील असेच वातावरण होते, त्यानंतर खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, आमदार उल्हास पाटील यांनी पाठबळ दिल्याने सतेज पाटील यांचा आत्मविश्वास वाढला. या सगळ्याच नेत्यांनी ‘गोकुळ’ विरोधात रान उठवल्याने कमालीची वातावरण निर्मिती झाली होती; त्यामुळे सभा वादळी होणार हे निश्चित होते, घडलेही तसेच.