सरपंचपदासाठी चव्हाण यांच्याविरोधात शिवानंद कोरबू, तर उपसरपंचपदासाठी आरती मगदूम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आल्यानंतर नऊ मते मिळाल्याने सरपंचपदी चव्हाण व उपसरपंचपदी कोळी यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी केली.
चौकट - चिठ्ठी बहाद्दर
चंद्रकांत चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत समानमते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिठ्ठीचा निर्णय घेतला होता. चिठ्ठी चव्हाण यांचीच आल्याने ते निवडून आले होते. शिवाय आघाडीला एका मतांनी बहुमत मिळाले. सरपंचपदासाठी आघाडीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आघाडी नेत्यांनी पाच इच्छुकांमध्ये चिठ्ठी टाकली. यामध्येही चव्हाण यांनीच बाजी मारल्याने गावासह परिसरात चिठ्ठी बहाद्दर म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे.
फोटो - २६०२२०२१-जेएवाय-०५-चंद्रकांत चव्हाण, संभाजी कोळी