शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नेतृत्व चंद्रकांतदादांचे पण कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच, एकजुटीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 2:17 PM

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याबाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन

समीर देशपांडेकोल्हापूर : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक हेच भाजपचे कारभारी असतील असे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात पाटील समर्थक आणि महाडिक गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात संतुलन राखण्याचे आव्हान मंत्री पाटील आणि महाडिक यांच्यासमोर आहे.गेल्या लोकसभेला पराभव झाल्यानंतर वर्षभरातच महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महाडिक हळूहळू पक्षात सक्रिय झाले. परंतु तेव्हा सत्ता नव्हती. त्यामुळे होणाऱ्या आंदोलनात महाडिक गटाचे कार्यकर्ते अपवादाने दिसायचे. परंतु परिस्थिती बदलत गेली. साखर कारखान्यांबाबत केंद्र शासनाकडे ज्या मागण्या करायच्या असतील, बैठका घ्यायच्या असतील त्याची समन्वयाची जबाबदारी महाडिक यांच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून महाडिक यांचा पक्षातील दबदबा वाढला. यातूनच आता भाजपचे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे पक्षात नवीन येणाऱ्यांमुळे जुने अडगळीत पडणार नाहीत याची काळजी घ्या, असे आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळेच मंत्री पाटील व खासदार महाडिक यांचे नेतृत्व मानणारे दोन गट अशी स्थिती झाली आहे. मुख्यत: आंदोलनात व साखर वाटपात सगळीकडे चंद्रकांतदादा गट सक्रिय असतो. पक्षाचा एखादा कार्यक्रम आहे व जिथे स्वत: महाडिक उपस्थित आहेत, तिथेच त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असते असेही चित्र अनेकदा दिसले आहे. मंत्री पाटील यांना मानणाऱ्या गटाकडे लोकबळ मर्यादित आहे. त्यामुळे पक्षाचा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यास त्यासाठी महाडिक गटाची ताकद लागते ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजप म्हणूनच या दोन्ही नेत्यांना मानणारे कार्यकर्ते एकजूट झाल्यास पक्षाची ताकद वाढणार आहे. सध्या तसे होताना दिसत नाही म्हणूनच एका जिल्ह्यातील पक्षांतर्गत तक्रारी थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेल्या आहेत. तोंडावर लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात झालेली ही विभागणी अडचणी वाढवणारी ठरू शकते.आवाज कुणाचा...जर धनंजय महाडिक कोल्हापुरात नसतील तर अरूंधती महाडिक, त्यांची तिन्ही मुले, अमल महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम आणि त्यांच्यासोबतची आजी, माजी नगरसेवकांची फौज सक्रिय असते त्यामुळे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याबाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकchandrakant patilचंद्रकांत पाटील