शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीची सत्ता : चंद्रकांतदादा पाटील

By admin | Published: March 11, 2017 3:59 PM

संख्याबळ ४० पर्यत, अध्यक्ष युतीचाच, फक्त औपचारीकता बाकी,

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीची सत्ता : चंद्रकांतदादा पाटीलसंख्याबळ ४० पर्यत, अध्यक्ष युतीचाच, फक्त औपचारीकता बाकी, आॅनलाईन लोकमत कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना मित्रपक्ष आघाडीची सत्ता येईल, त्याबाबत घोषणांची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर कोल्हापूरातील शिवाजी चौकात भाजपतर्फे विजयोत्सव करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकांतदादा पत्रकारांशी बोलत होते.कोल्हापूरातील जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावले आहेत. पण शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. याबाबत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेचीच सत्ता स्थापन होण्यास काहीच हरकत नाही, याबाबत वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षाची मने जुळली असल्याने जिल्हा परिषदेवर भाजप-सेनेचा झेंडा फडकण्यास काहीही अडचण नाही. सोमवारी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी राहीली आहे. सत्तेसाठी आवश्यक असणारा ३४ सदस्य संख्याबळाचा अकडा केव्हाच पार केला असून तो ४० पर्यत पोहचला आहे. त्यामुळे सत्ता स्थापण्याबाबतची फक्त औपचारिकता बाकी आहे. विरोधकांच्या सत्तेच्या दाव्याबाबत ते म्हणाले, कोणताही विरोधक हा सत्तेसाठी प्रयत्न करणारच, त्याप्रमाणे कोल्हापूरात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रयत्न सुरु केले आहेत, विविध राज्यातील निवडणूक निकालापूर्वीही विरोधकांनी उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असा दावा केला होता, तसाच दावा कोल्हापूरात सुरु असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)