शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

मैदानांना आवश्यक सुविधा पुरविणार --चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकर हे फुटबॉलप्रेमी आहेत. शहरात अनेक चांगले, नामवंत खेळाडू आहेत. शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉलचे सामने होतात; पण याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शहरातील सर्व मैदानांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खेळाशी संबंधित आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा ...

ठळक मुद्दे स्ट्रक्चरल आॅडिट करणार;‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’चा शानदार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकर हे फुटबॉलप्रेमी आहेत. शहरात अनेक चांगले, नामवंत खेळाडू आहेत. शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम येथे फुटबॉलचे सामने होतात; पण याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शहरातील सर्व मैदानांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खेळाशी संबंधित आवश्यक त्या सुविधा या ठिकाणी लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धा दि. ६ ते २४ आॅक्टोबरदरम्यान भारतात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शुक्रवारी राज्यात ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापुरातील या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडागंणावर पालकमंंत्री पाटील यांच्या हस्ते फुटबॉलची किक मारून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डी. बी. पाटील, ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सूजय पित्रे प्रमुख उपस्थित होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशेटिव्ह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे फुटबॉलप्रेम प्रसिद्ध आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने एक उत्साही वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा फुटबॉलमय होऊया आणि क्रीडा संस्कृती रूजवूया. शाहू छत्रपती म्हणाले, फुटबॉल हा जगभरात सर्वांत लोकप्रिय असणारा खेळ असल्याने महाराष्ट्राने यामध्ये मागे राहून चालणार नाही. कोल्हापुरात त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या खेळाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. या कार्यक्रमात महापौर हसिना फरास, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. न्यू कॉलेजचे जिमखाना प्रमुख अमर सासने यांनी प्रास्ताविक केले. व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी आभार मानले.यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष एस. आर. चरापले, आर. डी. पाटील, आर. व्ही. शेटगे, सुभाष पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, लालासो गायकवाड, सतीश सूर्यवंशी, आदींसह फुटबॉलप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.अभिनव उपक्रम राबविणारे एकमेव राज्यया उपक्रमांतर्गत दहा लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील ३० हजार शाळांना प्रत्येकी तीन याप्रमाणे सुमारे लाखभर फुटबॉल वितरित करण्यात आले आहेत. राज्यात विविध पातळ्यांवर फुटबॉलचे सामने आज, शनिवारी खेळले जाणार आहेत. अशा प्रकारचा ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ हा अभिनव उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.नृत्याने जिंकली मनेया उपक्रमाच्या उद्घाटनानंतर१२, १४, १६ आणि खुल्या गटातील खेळाडूंचे मैत्रीपूर्ण सामने खेळविण्यात आले. फिफा वर्ल्डकप साँगवरील गाण्यांवर युवकांनी, तर महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघातर्फे काढण्यात आलेल्या ‘डॉल्बी हटवा, जीवन वाचवा’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.