Kolhapur North byelection: 'काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपला द्यावा, आम्ही आमदार बनवतो'- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:09 PM2022-03-23T15:09:37+5:302022-03-23T15:24:45+5:30

Kolhapur North byelection : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या जागेवर आता पोटनिवडणूक होत असून, काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Chandrakant Patil on Kolhapur North byelection: 'Congress should give their candidate to BJP, we will make her MLA' - Chandrakant Patil | Kolhapur North byelection: 'काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपला द्यावा, आम्ही आमदार बनवतो'- चंद्रकांत पाटील

Kolhapur North byelection: 'काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपला द्यावा, आम्ही आमदार बनवतो'- चंद्रकांत पाटील

Next

कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, ''काँग्रेसने त्यांचा उमेदवार आमच्याकडे द्यावा,'' असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil)  यांनी काँग्रेला दिले आहे.

'काँग्रेसने उमेदवार आम्हाला द्यावा'
मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''काँग्रेसने त्यांचा उमेदवार भाजपकडे द्यावा, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो. अजूनही काही तास शिल्लक आहेत, यावर विचार करावा," असे थेट आवाहनचं पाटलांनी केले.

भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव(Jayshree Jadhav)  यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पण, जयश्री जाधव यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला.

Web Title: Chandrakant Patil on Kolhapur North byelection: 'Congress should give their candidate to BJP, we will make her MLA' - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.