शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

Chandrakant Patil: चंद्रकांतदादांचे पुन्हा भाकित, आता म्हणाले फडणवीस वर्षभरातच मुख्यमंत्री होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:48 PM

आजरा : महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा करण्यात आलयं. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष ...

आजरा : महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा करण्यात आलयं. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी अनेक तारखा देखील दिल्या. मात्र, त्यांची ही भाकिते फोल ठरली आहेत. यानंतर, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असे भाकित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा दावा केला आहे.येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा ६१ ची कार्यक्रम होईल असेही चंद्रकांतदादा म्हणाले. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर तर प्रमुख उपस्थिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते.पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्री लक्ष्मी देवी उद्यान संकल्पक पत्रकार समीर देशपांडे, उद्यान विकासक सुधीर कुंभार, मयूर कुंभार व श्री लक्ष्मी देवी यात्रा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीर पिता व वीर माता यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास महादेव उर्फ बापू टोपले, विलास नाईक, मलिक बुरुड, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, सुधीर मुंज डॉ.अनिल देशपांडे,रमेश कारेकर, सरव्यवस्थापक आनंदा कुंभार यासह पतसंस्थेचे संचालक, सभासद व आजरेकर नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर देशपांडे तर उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री