कोल्हापूर : उत्तरची निवडणूक आपण जिंकू शकू, हा विश्वासच राहिला नसल्याने, भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून मतदारांना ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. आरक्षणाच्या विरोधी असणाऱ्या भाजपने आपल्याच बगलबच्चांना पुढे करून, न्यायालयात याचिका दाखल करून मराठा आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही त्यांनी केला.कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या सावंत यांनी पत्रकारांंशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज पाटील, शशांक बावचकर उपस्थित होते. सावंत म्हणाले, औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाराणी ताराराणीच्या या कर्मभूमीत महिलांच्या क्षमतेवर अविश्वास दाखविणे हे दुर्दैवी आहे. सैनिकांच्या पत्नीविषयी बोलणारे परिचारक आणि महिलांच्या क्षमतेवर शंका घेणारे महाडिक हे दोघेही भाजपच्या मनुवादी मानसिकतेचे दर्शन घडवितात.हा तर भाजपचा कुटिल डावमहाडिक यांच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे, दगडफेकीचा प्रकार करुन लोकांचे लक्ष वेगळीकडे वळविण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे. महिलांचा अवमान करणाऱ्यांना येथील जनता येथेच मातीत गाडते, हा इतिहास भाजपने जरूर तपासावा.भाजपच्या नेत्यांना फेअर अँड लव्हली लावली आहे का?भाजपकडून केवळ सत्तेसाठी तपासयंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. सगळे विरोधक दोषी असतील, तर मग भाजपच्या नेत्यांना काय फेअर अँड लव्हली लावून गोरेगोमटे केले आहे का, असा खोचक सवालही सावंत यांनी केला.भाजप हे आधुनिक गँगस्टरकोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळविणारे भाजप हे आधुनिक काळातील गँगस्टर आहेत. स्वातंत्र्य, संविधान यांच्या निर्मितीत त्यांचे योगदान नसल्याने त्याबद्दल त्यांना आदरही वाटत नसल्याचा आरोप सावंत यांनी केला.छत्रपतींच्या वंशजांचा अवमानमराठा आरक्षण विषयावर संभाजीराजेंना संसदेत बोलू दिले नाही, स्वत: मोदींनी भेट दिली नाही. दोन्ही छत्रपतींना मागच्या रांगेत उभे करून, छत्रपतीच्या वंशजाचा अपमान केल्याचेही सावंत यांनी सांगितले.
विश्वास नसल्यानेच चंद्रकांत पाटलांची मतदारांना ईडीची धमकी, सचिन सावंत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 12:41 PM